• Sat. Sep 21st, 2024

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी धक्कादायक घटना….! किल्ले राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू, काय घडलं?

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी धक्कादायक घटना….! किल्ले राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू, काय घडलं?

पुणे : पावसाळा सुरू असल्याने पर्यटक गड किल्ल्यांवर, निसर्गाच्या सानिध्यात फिरायला येत असतात. त्यामुळे अनेक घटना घडताना पाहायला मिळतात. त्यातच पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यात असणाऱ्या किल्ले राजगड येथील पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आज ( मंगळवारी) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

अजय मोहनन कल्लामपारा (वय.३३) रा. भिवंडी, ठाणे असं मृत झालेल्या तरुणाचे नाव असून तो टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीत काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. तो त्याच्या मित्रांसमवेत राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. त्यांचा चौघांचा ग्रुप होता.
गॅरेजला लागलेली आग गॅस स्टेशनपर्यंत पोहोचली, टँकचे स्फोट, ३० जणांचा मृत्यू, १०० जण भाजले
याबाबत अधिक माहिती अशी की, वेल्हे तालुक्यातील राजगडावर ठाणे येथून चार पर्यटक फिरण्यासाठी आले होते. सोमवारी रात्री अजय हा किल्यावर असणाऱ्या पद्मावती टाकीत पाणी काढण्यासाठी गेला होता. पाणी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्याच्या टाकीत पडला. रात्रीचा काळोख असल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्याचा शोध लागला नाही. रात्र खूप असल्याने कुणाची मदत मिळण्यास अडचणी आल्या. मात्र सकाळी त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आला.
दीड महिना झाले अजित पवार आले नाहीत; मतदारसंघात एकच चर्चा, …तेव्हाच दादा बारामतीत येणार!
नियोजन करून फिरायला आलेल्या मित्रांना अजयच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. अजय हा मित्रांशी आपलेपणाने वागत असे. सर्वांशी त्याचे वागणे चांगले होते. मात्र गड किल्ल्यांवर फिरायला येताना खूप काळजी घेणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे राजगड किल्ला असो वां कोणताही किल्ला असो त्यावर काळजी घेऊन येणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
मविआतून राष्ट्रवादीला वगळून लढण्याच्या प्लॅन बीच्या चर्चा, ठाकरे समर्थक खासदारानं सगळं स्पष्ट केलंं, म्हणाले..

उजनी घरणातून हक्काचं पाणी आणणार, तानाजी सावंतांची ग्वाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed