• Sat. Sep 21st, 2024

महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये ओळख अन् मैत्री; जळगावात तरुणीसोबत घडले धक्कादायक

महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये ओळख अन् मैत्री; जळगावात तरुणीसोबत घडले धक्कादायक

जळगाव: बाहेरील जिल्ह्यातील दोघा तरुणांनी जळगावातील महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतला. जळगावात भाडेकरारावर खोली करुन राहिले, याचदरम्यान त्याच्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीसोबत मैत्री केली नंतर तिच्यासोबत काही फोटो काढले. भेटायला न आल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान शब्बीर मन्यार (वय २३ रा, साक्री ता. धुळे) आणि इकबाल खान गौस मोहम्म्द खान (वय २४ पाथरी, जि. परभणी) अशी संशयितांची नावे असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणांनी अशाच प्रकारे इतरही काही तरुणींची फसवणूक केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती असून त्या दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

जळगाव शहरातील एका नामांकित महाविद्यालयात एक २० वर्षीय तरुणी शिक्षण घेत आहे. एप्रिल २०२२ मध्ये महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये बसलेले असताना तरुणीची त्याच्या महाविद्यालयात शिकणााऱ्या एका विद्यार्थ्याशी ओळख झाली. तरुणाने स्वतःचे नाव जॅक उर्फ सागर सोनवणे रा.साक्री, ता.धुळे असे सांगितले. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले. काही दिवसांनी दोघे इस्टाग्रामला भेटले असता तरुणाचे नाव इमू मन्यार असल्याचे तिला दिसले. तरुणीने याबाबत विचारणा केली असता मुस्लीम मुलांशी मुली बोलत नाही, म्हणून नाव खोटे सांगितले असे तो म्हणाला. तसेच स्वतःचे नाव इम्रान शब्बीर मन्यार असल्याचे त्याने कबूल केले.

विद्यार्थीनीला तरुणासोबत काढलेले सेल्फी पडले महागात

इमरान शब्बीर मन्यार आणि इकबाल खान गौस हे जळगावात आदर्श नगरात भाडे करारावर खोली करुन वास्तव्यास होते. महाविद्यालय प्रोजेक्ट आणि इतर शैक्षणिक कामानिमित्त दोघे भेटत असताना त्याने तरुणीसोबत सेल्फी काढले. जून – जुलै २०२२ मध्ये प्रोजेक्टच्या कामानिमित्त इम्रानने तरुणीला तो राहत असलेल्या रामानंद नगर स्टॉप जवळील खोलीवर बोलाविले. त्याठिकाणी असलेल्या इम्रानचा मित्र इक्बाल याच्यासोबत ओळख करून दिल्यावर तो निघून गेला. काही वेळाने इम्रानने तरुणीसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न करीत सेल्फी ते डिलीट करण्याचे सांगितले असता त्याने काही होत नाही म्हणून नकार दिला.

तरुणाचा फोननंबर ब्लॉक केला, तरही…

तीन दिवसांनी पुन्हा त्याने तरुणीला फोन करून भेटण्यास बोलाविले. तिने नकार दिला असता त्याने फोटो आई – वडील, मित्र मैत्रिणींना आणि इतरत्र व्हायरल करण्याची धमकी दिली. भीतीपोटी तरुणी भेटायला गेली असता त्याने जबरदस्ती तिच्यावर अत्याचार केला. ऑगस्ट – सप्टेंबर २०२२ मध्ये पुन्हा त्याने मुलीला फोन करून अजिंठा चौफुली जवळील एका हॉटेलवर भेटण्यास बोलाविले. मुलीने नकार दिला असता गेल्यावेळी आपल्या संबंधांचे फोटो माझा मित्र इकबाल याने काढले असून ते त्याने दाखविले. तेव्हा देखील त्याने विद्यार्थिनीवर अत्याचार केला.

हळूहळू विद्यार्थिनीने त्याच्याशी संबंध तोडत त्याचा क्रमांक ब्लॉक केला. तरी देखील त्याने इतर क्रमांकावरून त्रास देणे सुरूच ठेवले होते. तू माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी तो नेहमी धमकी देत होता. १३ ऑगस्ट २०२३ पासून त्याने पुन्हा फोटो, मेसेज करून धमकविण्यास सुरुवात केली. त्रास असह्य झाल्याने तरुणीने घडलेला प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने तिच्या भावाला प्रकार सांगितल्यावर प्रकार उघड झाला. त्यानुसार रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गभाले हे करीत आहेत. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी इमरान शब्बीर मन्यार आणि इकबाल खान गौस मोहम्म्द खान या दोघांना अटक केली आहे. दोघांकडून काही मोबाईल, लॅपटॉप, तसेच त्यांची महागडी दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती असून त्यांनी अशाचप्रकारे इतरही काही तरुणांची फसवणूक केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे त्यानुसार पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed