Uddhav Thackeray Shiv Sena UBT MPs to rebel : खासदारांचा हा गट एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दिल्लीत भाजपचे शीर्षस्थ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गोपनीयरीत्या भेट घेणार आहे. यापैकी एका खासदाराला केंद्रात राज्यमंत्रिपद देण्याची बोलणी झाल्याचेही कळते.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
संजय व्हनमाने, मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नऊपैकी सहा खासदारांना आपल्या गळाला लावण्यात शिवसेना पक्षाला यश आले असून, हे खासदार वेगवेगळ्या मार्गांनी आज, बुधवारी दिल्लीत पोहोचणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. खासदारांचा हा गट शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दिल्लीत भाजपचे शीर्षस्थ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गोपनीयरीत्या भेट घेणार असल्याचीही माहिती आहे. यापैकी एका खासदाराला केंद्रात राज्यमंत्रिपद देण्याबाबत बोलणी झाल्याचेही कळते.
ठाकरेंवर खासदारांची नाराजी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असलेल्या खासदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रविवारी खासदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला चार खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर पाच खासदार ऑनलाइन उपस्थित होते. ऑनलाइन उपस्थित असलेल्या खासदारांनी त्यांच्या अनुपस्थिती- मागील वेगवेगळी कारणे दिली असली, तरी हे खासदार प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून संबंधित खासदार कधी प्रत्यक्षात, तर कधी ऑनलाइन पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करीत होते, असे सूत्रांनी सांगितले. Saksham Tate Case : बोल ना बाळा… आंचलचे सक्षमच्या भावाला मेसेज? गैरवर्तनाचे आरोप ताटे कुटुंबाने फेटाळले, स्क्रीनशॉटच दाखवले
एकाला केंद्रात राज्यमंत्रिपदाचा शब्द
एकूण नऊ खासदारांपैकी दोन तृतीयांश खासदार फुटून त्यांनी वेगळा गट केल्यास त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई होणार नसल्याने सहा खासदारांचा गट करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते कामाला लागले होते. विशेष म्हणजे या गटातील एका खासदाराला केंद्रात राज्यमंत्रिपद देण्याचा शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी या खासदारांमध्ये स्पर्धा सुरू आहे. यातील एक मुंबईतील खासदार मंत्रिपदासाठी अडून बसल्याचीही माहिती आहे. मात्र, यावरही आता मार्ग काढण्यात आला आहे.
पवनराजेंसह समद काझींसाठी लढाई, २० वर्षांच्या संघर्षावर ओमराजेंचं मोठं विधान
शिवसेनेचा वर्धापन दिन १९ जून रोजी असल्याने त्यापूर्वी शिवेसना (उबाठा) पक्षाच्या या खासदारांना शिवसेनेत आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. Sanchita Ugale : संचूss उठ ना बबड्या, मला आई म्हण ना… अभिनेत्री संचिता उगलेला अखेरचा निरोप देताना आईची व्याकुळ अवस्था
मंत्रिपदाबाबत उत्सुकता
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या या खासदारांची अलीकडेच एक बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिपदाची मागणी करण्यात आल्यानंतर मंत्रिपद देऊ, असा शब्द शिवसेना नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे समजते. या गटाचे नेतृत्व मराठवाड्यातील एक खासदार करीत असल्याचेही समोर आले असून, हा खासदार मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे समजते. मात्र, मुंबईतील एक खासदार मंत्रिपदासाठी अडून बसल्याने मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा