• Thu. Jun 18th, 2026
    Anil Deshmukh: चांदिवालचा अहवाल का दडपला? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार

    Anil Deshmukh On Chandiwal Commission: देशमुख यांनी सोमवारी राज्यपालांना पत्र लिहित याची तक्रार करत अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली.

    अनिल देशमुख(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्या. के. यू चांदिवाल आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर होऊन चार वर्षे उलटूनही खुला करण्यात आलेला नाही. अहवाल जाहीर न करणे हा नैसर्गिक न्यायाचा खून असून तो त्वरित जाहीर करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, तसेच विधानसभेच्या पटलावर ठेवावा, तसेच सार्वजनिक न करण्याच्या विलंबाच्या कारणांची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याकडे केली आहे.

    महाविकास आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी केला होता. या आरोपांची चौकशी करण्यासाठी २०२१ रोजी निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने आपल्या चौकशीचा अहवाल एप्रिल २०२२ मध्येच राज्य सरकारकडे सादर केला होता. परंतु, हा अहवाल अद्यापही खुला करण्यात आलेला नाही.

    Maharashtra TimesJayant Patil: राज्यातील स्मार्ट मीटर योजनेला स्थगिती द्या! जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
    आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांकडे मी तब्बल ११ वेळा पत्र लिहून हा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. परंतु, राज्य सरकारने आजतागायत हा अहवाल हेतूपुरस्सर दडवून ठेवला आहे. या चौकशीतील निष्कर्ष, शिफारसी आणि वस्तुस्थिती ही माझ्या कायदेशीर, सार्वजनिक आणि वैयक्तिक अधिकारांशी थेट निगडित आहेत.

    Maharashtra Timesपावसाळी अधिवेशनाचं बिगुल वाजलं! 22 जूनपासून होणार सुरु, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
    माझ्यावर झालेल्या गंभीर आरोपांतील सत्य जाणून घेण्यापासून मला आणि महाराष्ट्रातील लोकांना वंचित ठेवणे, हा नैसर्गिक न्यायाच्या मूलभूत तत्त्वांना गंभीर धक्का आहे, असे देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे. अहवाल जाहीर न करणे ही नैसर्गिक न्यायाची हत्या असून विद्यमान सरकारच्या पारदर्शकतेवर आणि हेतूवर गंभीर संशय निर्माण होत असल्याचेही देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा