Thane boy saves man from drowning : कळवा नवीन खाडी पुलाजवळ पात्रात बुडणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा जीव अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याची तत्परता आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने वाचला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : कळवा नवीन खाडी पुलाजवळ पात्रात बुडणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा जीव अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तत्परतेने आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने वाचला. मंगळवारी सकाळी या खाडी पात्रात बुडणाऱ्या नौशाद मेहरूम (३०) यांना ४ वर्षीय वरुण निलके या चिमुकल्याने पाहिले. त्यांनी तात्काळ हा प्रकार येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या साकेत वाहतूक पोलिस चौकीजवळील वाहतूक पोलिसांना सांगितले. वाहतूक पोलिसांनी त्याचवेळी रस्त्यावरून जाणारी अग्निशमन दलाची गाडी थांबवून त्यांच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे अग्निशमन केंद्र अधिकारी संदीप कदम, अग्निशमन दलातील चालक गणेश गवारी यांनी तात्काळ खाडीत उडी मारून मेहरूम यांचा जीव वाचवला.
बुडणाऱ्या तरुणाला चिमुरड्याने पाहिलं
मानसिक स्थिती ठीक नसलेल्या नौशाद मेहरूम खाडीपात्रात उतरले होते. यावेळी अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. हा प्रकार खाडी किनाऱ्यावर जवळ खेळणाऱ्या वरुणने पाहिला. त्यांनी तात्काळ वाहतूक पोलिसांच्या कानावर ही बाब टाकली. सुदैवाने त्याचवेळी अग्निशमन दलाची गाडी येथून जात होती. ही गाडी वाहतूक पोलिसांनी रोखली. त्यांना हा प्रकार समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी थेट खाडीपात्राच्या दिशेने धाव घेतली. Saksham Tate Case : बोल ना बाळा… आंचलचे सक्षमच्या भावाला मेसेज? गैरवर्तनाचे आरोप ताटे कुटुंबाने फेटाळले, स्क्रीनशॉटच दाखवले यावेळी नौशाद बुडत असल्याचे पाहताच अग्निशमन दलाचे अग्निशमन केंद्र अधिकारी संदीप कदम, अग्निशमन दलातील चालक गणेश गवारी यांनी खाडीत उडी मारत नौशादला वाचवले. त्याची प्रकृती स्थिर असून त्याला पुढील कार्यवाहीसाठी ठाणेनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.
वाढदिवसाला CM फडणवीसांच्या शुभेच्छा, केजरीवाल दुरावले; अण्णा हजारेंची प्रतिक्रिया चर्चेत
चिमुकल्याचे कौतुक
अत्यंत कमी वेळात चिमुकला वरुण याने ही बाब हेरून पोलिसांना सतर्क केल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच वाहतूक पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ कार्यवाही केल्याने नौशाद बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. Crime News : 20 सहकारी, फार्महाऊस पार्टी, मध्यरात्री एकाचा संशयास्पद मृत्यू, गूढ उकलताना वीसही जणांबाबत कॉमन गोष्ट आढळली
प्रशासनाकडून दखल
कळवा खाडीत बुडणाऱ्या नौशादचे अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडसी बचाव करून त्याचा जीव वाचवला. याबाबत अग्निशमन अधिकारी संदीप कदम आणि वाहनचालक गणेश गवारी यांचे धाडसी कामगिरी केल्याबद्दल महापौर शर्मिला पिंपळोलकर व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा