Maharashtra Weather : वायव्येकडून वाहणारे उष्ण वारे, अरबी समुद्रातील साडेतीन ते चार किलोमीटर उंचीवरील प्रत्यावर्ती वाऱ्यांची प्रणाली आणि कमकुवत मान्सूनचा प्रवाह यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीत अडथळे निर्माण झाले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यात पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मान्सूनची वाटचाल गेल्या आठवड्यापासून जवळपास थांबली असून, २५ जूननंतरच त्याला मान्सूनला गती मिळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या कोकणातील हर्णै ते सोलापूर या पट्ट्यात स्थिरावलेला मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने त्याची प्रगती मंदावली आहे.
मान्सूनच्या पुढील वाटचालीत अडथळे
निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायव्येकडून वाहणारे उष्ण वारे, अरबी समुद्रातील साडेतीन ते चार किलोमीटर उंचीवरील प्रत्यावर्ती वाऱ्यांची प्रणाली आणि कमकुवत मान्सूनचा प्रवाह यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे आठ जूनपासून महाराष्ट्रातील मान्सूनरेषेत विशेष बदल झालेला नाही. Saksham Tate Case : बोल ना बाळा… आंचलचे सक्षमच्या भावाला मेसेज? गैरवर्तनाचे आरोप ताटे कुटुंबाने फेटाळले, स्क्रीनशॉटच दाखवले
२५ जूननंतर मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता
मात्र, २३ जूनच्या सुमारास वातावरणात काहीसा बदल होण्याची शक्यता असून, त्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो. २५ जून ते एक जुलै या कालावधीत मुंबईसह संपूर्ण कोकणात चांगल्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मान्सून मुंबईत स्थिरावल्यानंतर सह्याद्री ओलांडून मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही त्याची प्रगती होऊ शकते.
पवनराजेंसह समद काझींसाठी लढाई, २० वर्षांच्या संघर्षावर ओमराजेंचं मोठं विधान
उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती
मान्सूनच्या प्रतीक्षेत असतानाच राज्यातील अनेक भागांना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. आजपासून १९ जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असून, रात्रीच्या वेळी उकाड्याचाही त्रास जाणवू शकतो. Maharashtra Politics : ठाकरेंचे नऊपैकी सहा खासदार शिंदेंच्या गळाला? मुंबईकर खासदार मंत्रिपदासाठी अडून, केंद्राकडून महत्त्वाचा शब्द
पेरण्यांसाठी तूर्त थांबा
पावसातील खंडामुळे खरीप हंगामातील पेरण्यांबाबत शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत. पेरणीयोग्य ओलावा निर्माण होण्यासाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने शेतकऱ्यांना आणखी काही दिवस संयम बाळगावा लागणार आहे. जूनअखेरीस पावसाची स्थिती आणि जुलैच्या सुरुवातीला होणाऱ्या वातावरणीय बदलांनंतर पेरणीबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होईल, असे खुळे यांनी सांगितले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा