• Sat. Sep 21st, 2024
कारमधून पुलावर आले, गाडी थांबवली, शूज काढले आणि सुप्रसिद्ध डॉक्टरची नदीत उडी अन् अनर्थ

जळगाव: चोपडा तालुक्यात असलेल्या निमगव्हाण येथील तापी नदीच्या पुलावरून एका डॉक्टरांनी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज १५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. दलितमित्र डॉ.व्ही.आर.पाटील (७५, रा.पाळधी ता.धरणगाव) असे मयत डॉक्टरांचे नाव आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच्या डॉक्टरांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
१२ वर्षीय मुलगा सारखा उलट उत्तरे द्यायचा; पित्याला आला राग, संतापातून घडलं धक्कादायक कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी येथील रहिवासी डॉ व्ही. आर पाटील हे आज मंगळवारी त्याच्या कारने चोपडा तालुक्यात असलेल्या निमगव्हाण येथील तापीनदीच्या पूलावर गेले. याठिकाणी त्यांनी पूलावर त्यांची कार उभी केली. त्यानंतर डॉ. पाटील यांनी पूलावरुन तापी नदीपात्रात उडी घेतली. यादरम्यान काही प्रत्यक्षदर्शीमुळे घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पुलावर उभी असलेल्या कारवरुन पूलावरुन उडी घेणारी व्यक्ती ही डॉ व्ही आर पाटील हे असल्याची ओळख पटली. त्यानुसार पाळधी येथे घटनेची माहिती कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती.

पत्नी अन् पुतण्याला संपवलं, पोलिस अधिकाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

पोलिसांकडून मृतदेहाचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात शोध राबविण्यात आली. मयत डॉक्टर व्ही. आर. पाटील त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा राकेश, सून, नातवंडे असा परिवार आहे. पाळधी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून व्ही. आर. पाटील ओळखले जातात. त्यांचा पाळधी येथील मेन रोडवर कस्तुरबा नावाचे हॉस्पिटल आहे. त्यांनी श्रीराम जेष्ठ नागरिक मंडळाची स्थापना केली होती. तसेच संत तुकाराम महाराज पंच मंडळाचेही ते अध्यक्ष होते. पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्ते असल्याने त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून यात त्यांचा दलितमित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. दरम्यान त्यांच्या निधनाची वार्ता कळताच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाळ सोनवणे समता परिषदेचे भूषण महाजन शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आणि मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानाजवळ मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed