• Wed. Jun 17th, 2026
    उद्धवसेना फुटीच्या उंबरठ्यावर, ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांचे रात्री 10.50 वाजता बुचकळ्यात टाकणारे ट्वीट

    Maharashtra Politics : माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना शुभेच्छा देणारी पोस्ट ठाकरे गटाचे विधानपरिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मंगळवारी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : एकीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नऊपैकी सहा लोकसभा खासदारांना आपल्या गळाला लावण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ला यश येत असल्याची स्थिती आहे. अशातच ठाकरे गटाचे विधानपरिषद आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांनी बुचकळ्यात टाकणारे ट्वीट केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत असताना, जो पक्ष केंद्रस्थानी आहे, त्या ठाकरेसेनेच्या बड्या नेत्यानेच समर्थकांना गोंधळात टाकले आहे.

    रश्मी शुक्ला यांना शुभेच्छा

    महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना शुभेच्छा देणारी पोस्ट मिलिंद नार्वेकर यांनी मंगळवारी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी केली. ‘माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची लोकायुक्त संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!’ असे त्यांनी लिहिले आहे. महाविकास आघाडीचं सरकार खिळखिळं करण्यात ज्यांचा मोठा हातभार असल्याचे आरोप झाले, पक्ष पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असताना नार्वेकर त्यांनाच शुभेच्छा देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

    विरोधीपक्षात असतानाही मिलिंद नार्वेकर यांनी सत्ताधाऱ्यांना शुभेच्छा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत अनेकांना त्यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु यावेळी टायमिंगची चर्चा होत आहे.
    Maharashtra TimesSaksham Tate Case : बोल ना बाळा… आंचलचे सक्षमच्या भावाला मेसेज? गैरवर्तनाचे आरोप ताटे कुटुंबाने फेटाळले, स्क्रीनशॉटच दाखवले

    राजकीय जाणकारांकडून आश्चर्य व्यक्त

    दरम्यान, राजकीय विश्लेषक दीपक पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून यावर भाष्य केले आहे. ‘आपला पक्ष दुसऱ्यांदा फुटीच्या उंबरठ्यावर असताना पक्ष नेतृत्वाला आधार द्यायचं सोडून मिलिंद नार्वेकर रश्मी शुक्ला यांचं लोकायुक्त कार्यालयात सदस्यपदी नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन करतात. ज्यांनी महाविकास आघाडीचं सरकार खिळखिळं करण्यासाठी आपलं पद वापरलं, फडणवीस आणि भाजपच्या एजंट म्हणून मुदतवाढ मिळवून काम केलं, अशा व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठी उच्च कोटीचं औदार्य किंवा कोडगेपणा असला पाहिजे.’ असं त्यांनी म्हटंल आहे.

    ऑपरेशन टायगर vs लांडगा, संजय राऊतांच्या टीकेला शिंदेसेनेचे प्रत्युत्तर, ज्योती वाघमारे कडाडल्या

    “पक्ष फुटून चार वर्षं उलटली. पक्ष दुसऱ्यांदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. अशा वेळेस उद्धव ठाकरेंचे विश्वासू वगैरे गणले जाणारे नार्वेकर रश्मी शुक्लावंर फुले वगैरे उधळत असतील तर मिलिंद नार्वेकर आणि राहुल नार्वेकर यांच्यात काहीही फरक करता येणार नाही. असे अस्तनीतले निखारे असताना उद्धव ठाकरेंना बाहेरच्या शत्रूंची काय गरज आहे?” असा बोचरा सवालही दीपक पवार यांनी पोस्टच्या अखेरीस विचारला आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा