• Mon. Nov 25th, 2024

    नाशिकच्या माजी नगरसेविकेकडून अंधश्रद्धेला खतपाणी; वास्तुदोष काढण्यासाठी चक्क बोकडबळी, काय आहे प्रकरण?

    नाशिकच्या माजी नगरसेविकेकडून अंधश्रद्धेला खतपाणी; वास्तुदोष काढण्यासाठी चक्क बोकडबळी, काय आहे प्रकरण?

    Nashik News : गेल्या ३ वर्षांपासून स्टेडिअमचं काम रखडलं, वास्तूदोष असल्यानं थेट स्टेडिअमच्या प्रांगणात थेट होमहवन, पूजा-अर्चा करीत चक्क बोकडाचा बळी दिला. ही घटना नाशिकच्या सिडको भागातून समोर आली आहे.

     

    स्टेडिअमचा वास्तुदोष काढण्यासाठी दिला बोकडबळी
    म. टा. वृत्तसेवा, सिडको : येथील राजे संभाजी स्टेडियमच्या विस्तारीकरणाचे काम तीन-चार वर्षांपासून रखडल्याने खेळाडूंची गैरसोय होत आहे. हे काम सुरू करण्यास विविध अडथळे येत असल्याने यात वास्तुदोष असल्याचा ‘जावईशोध’ लावून माजी नगरसेविका किरण दराडे व पती बाळ दराडे यांनी स्टेडिअमच्या प्रांगणात होमहवन, पूजा-अर्चा करीत बोकडाचा बळी दिला. राज्यात चमत्कार, अंधश्रद्धाविरोधी कायदा पारित करूनही अशा प्रकारच्या कृतीमुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

    काय प्रकरण?

    सिडकोत १५ वर्षांपूर्वी महापालिकेने भव्य-दिव्य राजे संभाजी क्रीडा संकुलाची निर्मिती केली आहे. क्रीडाप्रेमींना नवनवीन सुविधा मिळाव्यात यासाठी २०२०मध्ये शासनाच्या ‘खेलो इंडिया’अंतर्गत सदर स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांतून सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. नूतनीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांतच पुन्हा बंद पडले. यानंतर करोनाकाळात लॉकडाउनमुळे दोन वर्षे काम बंद होते. करोनाकाळात स्टेडियमचे काम घेतलेल्या एका ठेकेदाराचा मृत्यू झाला, तर दुसरा आर्थिक अडचणीत सापडला. यामुळे तीन ते चार वर्षांपासून नूतनीकरण रखडले आहे. दराडे दाम्पत्याने या स्टेडिअमच्या जागेत वास्तुदोष असल्याचा शोध लावत शनिवारी प्रशासनाची परवानगी न घेता स्टेडिअमच्या प्रांगणात थेट होमहवन, पूजा-अर्चा करीत चक्क बोकडाचा बळी दिला.
    तुम्हीही या संस्थेतून BBA केलंय का? ९ वर्षांपासून सुरु असलेल्या संस्थेच्या पदव्याच अनधिकृत
    आहार कोणता असावा, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु, नवसापोटी बोकडबळी ही निखालसपणे अंधश्रद्धा असल्याचे संतांनी म्हटले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नवसापोटी पशुबळीला विरोध करते. शासकीय काम व्हावे यासाठी योग्य मार्ग न अवलंबता समाजात अंधश्रद्धा वाढीस लावण्याचे हे कृत्य असल्याने आम्ही त्याचा निषेध करतो.- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस

    टीम मटा ऑनलाइन यांच्याविषयी

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed