ब्लॉककाळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेससह अन्य मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. काही मेल-एक्स्प्रेस पर्यायी मार्गांनी धावणार आहेत. काही अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. तीन दिवस मध्य रेल्वेवरील गाड्यांच्या बदलेल्या वेळांबाबत सविस्तर माहितीसाठी मध्य रेल्वेच्या वेबसाइटवर भेट द्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
१३ ऑगस्टला रद्द असणाऱ्या रेल्वेगाड्या
– १२०७१ सीएसएमटी-जालना जनशताब्दी
– ११४०१ मुंबई-आदिलाबाद
– १७६१८ हजूर साहिब नांदेड-मुंबई
१४ ऑगस्टला रद्द असणाऱ्या रेल्वेगाड्या
– २२२२३/४ सीएसएमटी-साईनगर-सीएसएमटी शिर्डी वंदे भारत
– ११११३ देवळाली-भुसावळ
– १७६१७ सीएसएमटी-नांदेड
– १२०७१/२ सीएसएमटी-जालना-सीएसएमटी जनशताब्दी
– १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम
– ११४०१/२ मुंबई-आदिलाबाद-मुंबई
– १७६१२ मुंबई-नांदेड राज्यराणी
– १७०५७ मुंबई सिकंदराबाद देवगिरी
– १७६१८ हजूर साहिब नांदेड-मुंबई
१५ ऑगस्टला रद्द असणाऱ्या रेल्वेगाडया
– ११११३ देवळाली-भुसावळ
– १७६१७ सीएसएमटी- नांदेड
– १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम
– १७६१२ मुंबई-नांदेड राज्यराणी
– १७०५७ मुंबई सिकंदराबाद देवगिरी
– ०७४२७ एलटीटी-हजूर साहिब नांदेड
अंशत रद्द रेल्वेगाड्या
-१४ ऑगस्टला धावणारी १२१०९ मुंबई-मनमाड एक्स्प्रेस नाशिक रोड स्थानकात रद्द करण्यात येईल. १५ ऑगस्टला नाशिक रोडवरून मुंबईसाठी रवाना होईल.
-१४ ऑगस्टला धावणारी १२१३१ दादर-साईनगर शिर्डी पुणे-दौंडमार्गे धावणार आहे.