• Sat. Sep 21st, 2024
पालकांनो सावधान…! १८ वर्षाखालील मुलांनी गुन्हा केला तर आता थेट वडिलांवर होणार कारवाई

पुणे: पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांची संख्या देखील तितकीच वाढत आहे. अशा गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी १८ वर्षाखालील मुलगा गुन्हेगारीत आढळला तर थेट त्याच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दिली आहे. या नव्या संकल्पनेमुळे तरी गुन्हेगारीला आळा बसेल अशी अपेक्षा आहे. यामुळे नवीन संकल्पना राबवली जाणार आहे.
आमदारांच्या गाडीवर दगडफेक; प्रकरणावर लोकप्रतिनिधी म्हणाले – हा पूर्वनियोजित कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी दोन टोळीच्या वादातून एकावर वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याच घटनेतील आरोपींनी एका चहाच्या दुकानात येऊन धुडगूस घातला होता. तसेच या परिसरात दुचाकी गाड्या उभा केल्या होत्या. या गाड्यांवर देखील आरोपींनी हल्ला चढवला. यामध्ये एका गाडीचे नुकसान झाले आहे. या सर्व प्रकरणानंतर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. गुन्हा नोंद झाल्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलीस आरोपीच्या शोधात होते. त्यावेळेस सहापैकी चार विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सांगवी गावात एकीकडे तणावपूर्ण वातावरण तर दुसरीकडे मुलांनी ठेवला समाजापुढे आदर्श

या गुन्ह्यामध्ये असणारे दोन विधी संघर्षित बालकांवर मागील ३०२ मध्ये गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांनी यांच्या राहत्या घरी तपास केला असता दोन तलवारी, तीन कोयते, एक चापर असा ऐवज पोलिसांना आढळून आला आहे. त्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये विधी संघर्षित बालकाच्या वडिलांना घरात विनापरवाना हत्यारे बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात घेतले आहे. त्यामुळे पोलिसांकडून माध्यमातून गुन्हेगारीतील पाल्यांच्या वडिलांना सांगू शकतो की, आपण पाल्याला वेळीतच आवरा नाहीतर आत्ता भोसरी एमआयडीसी पोलीस पाल्याच्या वडिलांवरच कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed