• Sat. Sep 21st, 2024
बांधकामाच्या ठिकाणी मृत्यूनं कवटाळलं; काम करताना कामगार कोसळला, दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपलं

जळगाव: शहरातील गणेश कॉलनी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरून काम करणारा मजूराचा तोल जाऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली. रहीम कासम पिंजारी (५२) रा. ममुराबाद ता. जि. जळगाव असे मयत मजूराचे नाव आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अतिवेगामुळे घडला अनर्थ…! खाजगी ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा भीषण अपघात; तरुणाचा जागीच अंत
मिळालेल्या माहितीनुसार, रहीम पिंजारी हे कुटुंबासह जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे वास्तव्याला होते. ठेकेदाराकडे बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रींगसह बांधकामचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी गणेश कॉलनी परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी ते सेंट्रींग काम करत होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास काम करत असताना त्यांचा तोल गेल्याने ते दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत काम करणाऱ्या मजूरांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषित केले.

कुटुंबीय आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत नितीन देसाईंच्या अस्थी विसर्जित

मयत रहीम यांच्या पश्चात पत्नी रुखसाना आणि जुबेर, तौसीफ हे दोन मुले असा परिवार आहे. रहीम यांच्या मृत्यूने त्यांच्या चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जिल्हा रुग्णालयात कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed