• Mon. Nov 25th, 2024
    मै तुझे भरे चौक मे बताऊंगा; तरुणाने दिली धमकी, एकटा भेटताच साधला डाव अन्…

    छत्रपती संभाजीनगर: मैने उसको जो जबान दी थी, ओ पुरी कर दी, म्हणत भर चौकात अवघ्या काही दिवसांवर लग्न आलेल्या ३० वर्षीय तरुणाला बंदुकीच्या गोळ्या घालून खून करणाऱ्या आरोपीने खून केल्याची कबुली दिली आहे. आरोपीला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी १३ तासांच्या आत अटक केली असून त्याला १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
    ऑनर किलिंगच्या घटनेने महाराष्ट्र हादरला, बापाने लेकीला संपवलं अन् शेतात नेऊन मृतदेह जाळला
    या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल खुतूब हबीब हमद (३०) रा. गल्ली नं. १४ बायजीपुरा याने रेकॉर्डवरील गुन्हेगार फय्याज बशीर पठाण (२७) रा.गल्ली नंबर २१ बायजीपुरा, याला साडेसात हजार रुपये उसने दिले होते. घेतलेले पैसे परत करताना फय्याज हा पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने खुतूब याने फय्याजच्या घरी जाऊन पैशाची मागणी करत आई वडिलांना शिवीगाळ केली. ही बाब फय्याज पठाण यांच्या जिव्हारी लागली होती. यावेळी फय्याजने खुतूब याला अब तू यहा से निकल जा, मै तुझे भरे चौक मे बताऊंगा, असे म्हणत हाकलून दिले. दरम्यान बुधवारी रात्रीच्या सुमारास खुतूब हबीब हा बौद्ध विहारजवळ येताच फय्याज पठाण याने खुतूब याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. यात खुतूब याचा मृत्यू झाला तर समीर पठाण हा जखमी झाला होता.

    घटनेनंतर वडिलांनी त्यास पकडून घरी नेले होते. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास गुन्हे शाखा आणि जिन्सी पोलिसांच्या पथकाने त्यास बायजीपुरा भागातून ताब्यात घेतले. खुतूब याचा मृतदेह घाटीत शवविच्छेदनानंतर बायजीपुरा भागात आणण्यात आला. अंत्ययात्रेपुर्वी खुतूब समर्थकांनी परिसरात दहशत पसरवत परिसरातील दुकाने बंद करण्यास भाग पाडली. दहशतीपोटी दुकानदारांनी काही काळ दुकाने बंद केली. कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी बायजीपुरा भागात सशस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.

    परभणीत तीन मद्यपींचा चालकाला वाद, बस पुढे नेण्यापासून रोखले; प्रवाशांचा २० मिनिटं खोळंबा!

    बायजीपुरा भागात गुन्हेगारी टोळ्या आणि नशखोरांच्या वर्चस्वाच्या वादावरून चार खून झालेले आहे. वर्चस्वाच्या वादावरुन नशेखोर भावडांनी अज्जू बिल्डर यांचा दगडाने ठेचून खून केला होता. हाकेच्या अंतरावर एका नशेखोराने मशिदीत घुसून नान विक्रेत्यास चाकूने भोसकले होते, तर सिकंदर हॉलजवळ पोलिसांचा खबर्‍या असल्याचा संशयावरून भररस्त्यावर दगडाने ठेचून खून केला होता. भररस्त्यावर घडलेल्या चार खुनांच्या घटनेने बायजीपुरा भागात दशहतीचे वातावरण पसरले आहे. आरोपीने शहरात इतर ठिकाणी काही गंभीर गुन्हे केले आहेत का, आरोपीचे आणखी कोण साथीदार आहेत, गुन्ह्यात त्यांचा कसा सहभाग होता, आरोपीने गुन्ह्यात वापरलेले पिस्टल कोणाकडून आणले? याबाबत तपास बाकी आहे. त्यामुळे सात दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली असता त्याला १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी दिले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *