• Sat. Sep 21st, 2024
हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे डॉ. शशिकांत अहंकारी यांचे निधन

धाराशिव : उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अणदूर येथील हॅलो मेडिकल फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचे आज सकाळी ७.३० वाजता पुण्यात दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेले सहा महिने कर्करोगावरील उपचारासाठी ते पुण्यात उपचार घेत होते.

डॉ. शशिकांत अहंकारी यांचे मूळ गाव खुदावाडी आहे. तिथून जवळ असलेल्या अणदूरमध्ये डॉक्टर अहंकारी यांनी आपल्या पत्नीसोबत मिळून हॅलो मेडिकल फाऊंडेशनची स्थापना केली होती. दोघे पती पत्नी जानकी हॉस्पिटलमध्ये सेवा देत होते.

शिवसेनेत फूट पडली, तरीही एकनिष्ठ राहिले, वर्षभरानंतर ‘वऱ्हाड’ ठाकरेंवर रूसलं, शिंदेंना यश!
डॉ. अहंकारी यांच्या हॅलो मेडिकल फाऊंडेशनकडून अनेक अतिरिक्त सेवा दिल्या जात होत्या. ज्यात दुय्यम-केअर हॉस्पिटल, आरोग्य विमा, स्वयं-सहायता गट, महिला सक्षमीकरण मंच, शाश्वत शेती आणि विज्ञान शिक्षण इत्यादीचा समावेश आहे.

१९९३ पासून आरोग्य क्षेत्रात भरीव सामाजिक काम करणाऱ्या हॅलो मेडिकल फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष असणारे डॉ. शशिकांत अहंकारी यांचे सामाजिक योगदान फार मोठे आहे. त्यांच्या निधनाने गोरगरीब, पीडित वंचित घटकांचा तारणहार निघून गेला असून त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी डॉ. शुभांगी अहंकारी, मुले आनंद व मुक्ता, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बायको स्कुटीवरून येत होती, तिची मोपेड अडविली, पोराला जबरदस्तीने उचललं, बापाने स्वत:च्याच लेकराचं अपहरण केलं
भूकंप असो अथवा कोविडचे संकट, दुष्काळ, विधवा, परितक्त्या पुनर्वसन सक्षमीकरण या सर्वात हॅलो संस्था डॉ.अहंकारी यांचे सामाजिक योगदान फार मोठे होते. अणदूर व परिसरातील सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांचा अंत्यविधी बुधवार दिनांक ९ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आणि अणदूर येथील हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या प्रांगणात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed