• Sat. Sep 21st, 2024

कोर्टाबाहेर धाड..धाड..धाड.. खंडणी प्रकरणातील आरोपींवर गोळीबारानं खळबळ, पोलीस अ‍ॅलर्ट

कोर्टाबाहेर धाड..धाड..धाड.. खंडणी प्रकरणातील आरोपींवर गोळीबारानं खळबळ, पोलीस अ‍ॅलर्ट

सातारा : वाई तालुक्यातील मेणवली येथील हॉटेल मालकास खंडणी मागितला प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात कुख्यात गुंड बंटी जाधव, निखिल मोरे आणि अभिजीत मोरे या तिघांना वाई न्यायालयात आणण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर अचानक अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या गोळीबारामुळे वाई परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईमध्ये दिवाणी न्यायालयात आज सोमवारी अचानक दुपारच्या सत्रात गोळीबार झाल्याची घटना घडली. त्यामुळे न्यायालयाच्या परिसरात असलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. या घटनेची माहिती वाई पोलिसांना मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास करण्यास सुरुवात केली आहे. गोळीबारामध्ये दोन फायर राऊंड करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात कोणाचा हात आहे? याच्या तपासासाठी सातारा पोलिसांनी एक पथक जिल्ह्यामध्ये रवाना केले आहे.
संकटामागून संकटं, करायचं काय?, कपाशी पडली लाल, शेतकऱ्याने ४ एकरातील कपाशीवर फिरविला ट्रॅक्टर, लाखोंचं नुकसान
सध्या घटनास्थळावरून फायर करण्यात आलेली काडतुसे जप्त करण्याचे काम सुरू आहे, तर परिसरामध्ये तणाव वाढू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या गोळबार घटनेची वाई पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असून, याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार, कारण समोर…
मेणवली येथील चंद्रकांत नवघणे या हॉटेल व्यवसायिकाला दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली गेली होती. त्याकरिता कळंबा कारागृहातून मुख्य प्रमुख संशयित हा फिर्यादीच्या फोनवर फोन करून वारंवार धमक्या देत होता. त्याने दि. १ जून २०२३ रोजी हॉटेल माधवन इंटरनॅशनल मेणवली येथे १२ साथीदारांना पाठवून त्याला पिस्टलचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच दीड तोळ्याची सोन्याची चैन दरोडा टाकून चोरून नेली. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात खंडणी व दरोडाचा १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी १२ संशयित आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार संशयित आरोपी हा मोक्का अंतर्गत कळंबा कारागृहात होता. त्याच्यासह अन्य दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली.
नाराजी वाढली! ४५ हजार कोटींची विकासकामे राज्याबाहेरच्या कंपन्याकडे, किरकोळ कामे स्थानिकांकडे

कराड येथील वराडे गावात एकाच वेळी तीन बिबटे शिरले, दोन हजार लोकवस्ती असलेलं गाव भयभीत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed