याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली ते मिरज रोडवरील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च या कॉलेज मध्ये वनविभागाच्या शिपाई पदासाठीच्या भरतीचा पेपर गुरुवार दि. ०३ ऑगस्ट रोजी होता. दुपारच्या सुमारास पेपर सुरु झाल्यानंतर संशयित अविनाश गुमलाडू हा त्याच्या बुटामध्ये मोबाईल लपवून ठेऊन केसातून मोबाईल ब्ल्यूटुथ हेडफोन लपवून कॉपी करत पेपर लिहीत होता.
मोबाईलवरून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुसरा संशयित अर्जुन नार्डे हा उत्तरे देत होता. यावेळी याठिकाणी असणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास सदरची बाब येताच त्यांनी अविनाश याची कसून तपासणी केली असता त्याच्याकडे मायक्रोफोन, मोबाईल, सॅंडल जोड, डिव्हाईस असा ३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल आढळला. यानंतर दोघांना विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी संशयित गुमलाडू यांच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचा मोबाईल आणि डिव्हाईस हे नार्डे याने दिले असून पेपर सुरु झाल्यानंतर तो याद्वारे उत्तरे देत असल्याचे सांगितले. यानंतर त्याच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांविरोधात परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, संशयित नार्डे याने अशा अनेक परीक्षेत अनेक उमेदवारांना कॉपी करून देत शासकीय नोकऱ्या मिळवून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले.
