• Sat. Sep 21st, 2024
विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात आव्हाड भिडेंवर बरसले; मात्र मुलांचे जय श्रीरामचे नारे ठरले चर्चेचा विषय

ठाणे: महात्मा गांधीचे वडील मुस्लिम होते. महात्मा फुले आणि राजाराम मोहन रॉय हे ब्रिटिशांचे दलाल होते आणि त्यांनी भारताला बिघडवलं, अशी विधान करून भिडे गुरुजी नेहमी इतिहासाचे बट्ट्याबोळ करतात. महात्मा गांधीजी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारे आणि महात्मा ज्योतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणारे गुरुजी तुम्हाला मान्य आहेत का? असा सवाल आव्हाडांनी कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थांना केला. यांना मी गुरुजी मानतचं नाही. कारण, गुरुजी हे नेहमी चांगले विद्यार्थी घडवतात. या गुरुजीला गुरुजी म्हणणारे चांगले विद्यार्थी असू शकतात का? असा खोचक टोला देखील यावेळी आव्हाडांनी लगावला.
तीन महिन्यांचे प्रशिक्षण; रोज शंभर रुपये मानधन, आता महिलांनी घडवल्या ६०० गणेशमूर्ती
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र किशोरी पेडणेकर यांच्यावर दाखल झालेला गुन्हा म्हणजे सुडाचे आणि द्वेषाचे हे राजकारण असल्याची प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिली असून खंत व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळाले नसतील तर या सरकारने अशा शेतकऱ्यांना शोधून त्यांना त्वरित पैसे द्यावेत अशी मागणीही आव्हाडांनी केली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि करियर मार्गदर्शन या कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

आव्हाड हे आपल्या पक्क्या पुरोगामी विचारांसाठी ओळखले जातात. तसेच विचार त्यांनी आयोजित कार्यक्रमात त्यांनी या विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमाचा समारोप होत असतानाच राष्ट्रगीत झाल्यानंतर आव्हाड विद्यार्थ्यांना स्वतंत्र भारत चिरायू होवो च्या घोषणा द्यायला सांगत होते. विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्यानंतर आव्हाडांनी जय हिंद म्हणत कार्यक्रमाचा समारोप केला. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी जय श्रीराम जय श्रीरामचे नारे देण्यास सुरुवात केली. संपूर्ण कार्यक्रमानंतर एकच चर्चा याबद्दल रंगताना दिसली. विद्यार्थी गुण गौरव सोहळा असताना त्यात आव्हाडांनी सेक्युलरिजम, भिडे गुरुजी, मणिपूर विषय, व्हेज-नॉनव्हेज वाद असले विषय आपल्या भाषणात काढल्याने विद्यार्थी चांगलेच वैतागले होते.

उद्धव ठाकरेंकडून चित्र प्रदर्शनाला भेट, चित्रकाराचं कौतुक करत मातोश्रीवर बोलावलं

त्याला जय श्रीरामच्या नाऱ्यांनी एक प्रकारे आपली नाराजीच व्यक्त केल्याची एकच चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी रंगली होती. यावर शिंदे गटाने सुद्धा निशाणा साधत आव्हाडांचा चांगलाच समाचार घेतला आहे. हे आव्हाडांना ठाण्यातील युवकांनी दिलेलं गिफ्ट आहे. भाषणात त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. मात्र त्यांना तरुण पिढीने दिलेलं हे उत्तर आहे. आज तरुणांचा कल कुठे आहे हे सांगत फार मोठी चपराक तरुणांनी त्यांना दिली आहे. सर्व तरुण हे नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहेत. याची ही एक झलक आहे. यापुढे आव्हाड जिथे जिथे वायफळ बडबड करतील तिथे जनता असेच त्यांना जय श्रीरामचे नारे देतील, असा जबरदस्त टोला शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आव्हाडांना लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed