• Mon. Nov 25th, 2024
    दैव बलवत्तर म्हणून…! चालकाचे वळणाकडे दुर्लक्ष; दोन एसटींचा अपघात, प्रवाशांच्या जीवाशी खेळ

    सिंधुदुर्ग: दोडामार्ग-वीजघर मार्गावरील घाटीवडे येथील वळणाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने एसटी बस चालविल्याने दोन एसटी बस रस्ता सोडून बाहेर गेल्याने अपघात झाला. त्यातील बेळगाव गाडी भरधाव वेगातच रस्ता सोडून बाहेरील जंगलात गेली. यामुळे आरडाओरड झाली. प्रवाशांनी चालकाच्या दरवाजातून बाहेर उड्या टाकल्या. वीजघर गाडीही मागच्या बाजूने गटारात गेली. या अपघातात सात जण जखमी झाले. त्यातील काहींवर साटेली भेडशी आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.
    ट्रकच्या धडकेत पोलिस वाहनाचा चक्काचूर; पोलिस शिपायासह ट्रकचालक जागीच ठार, २ जण जखमी
    प्रवाशांचे सुदैव म्हणून दोन्ही गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली नाही. अन्यथा चालकाच्या मस्तीमुळे निष्पाप प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागला असता.
    दरम्यान, याप्रकरणी वीजघर दोडामार्ग एसटीचे (एमएच १४ बीटी 3) चालक श्रीकृष्ण प्रदीप राऊत (३३, पडवे माजगाव,सावंतवाडी आगार) यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी सावंतवाडी बेळगाव एसटीचे (एमएच १४ बीटी ३८७४) चालक सर्वेश प्रमोद घाडी (रा. कोलगाव, सावंतवाडी आगार) यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती येथील पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली. अपघात सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडला आहे.

    दुसऱ्यानेच परस्पर पीकविमा काढला; शेती कसणारा शेतकरी पीकविमा लाभापासून वंचित

    या अपघातात रिया मालू गवस (१४), वैभव लक्ष्मण नाईक (१३), उलगप्पा गंगाप्पा पंडिवडार (५५), भागीरथी उलगप्पा पंडिवडार (५०), भागुबाई कोया पटकरे (६०),शशिकला शांताराम बेर्डे (६५), परशु कृष्णा पाटील (५३) हे जखमी झाले आहेत. यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed