• Mon. Nov 25th, 2024

    धक्कादायक! दारूच्या नशेत तो बहिणीला मारायला गेला, धाकटा भाऊ आणि जावयाने उचलले टोकाचे पाऊल

    धक्कादायक! दारूच्या नशेत तो बहिणीला मारायला गेला, धाकटा भाऊ आणि जावयाने उचलले टोकाचे पाऊल

    नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या देवलापार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंडकापर (लोढा) गावात रविवारी रात्री सख्ख्या भावाने आणि जावयाने मिळून एका तरुणाला संपवून टाकले. देवलापार पोलिसांनी तीन तासात दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

    नरेश जयसिंग वरठी (३०) असे मृताचे नाव असून महेश जयसिंग वरठी (२७) आणि जावई संजय श्रीराम इनवाते (४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही पिंडकापर (लोढा, जिल्हा रामटेक) येथील रहिवासी आहेत. मृतक नरेश जयसिंग याचा दारूच्या नशेत बहिण कविता ईनवाते हिच्याशी नेहमीच वाद होत होता. दरम्यान, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मृतक नरेश हा मद्यधुंद अवस्थेत बहिणीच्या घरी पोहोचला आणि तिला शिवीगाळ करू लागला.

    Sambhaji Bhide: गुन्हा दाखल होऊनही संभाजी भिडेंनी पुन्हा तेच केले, गांधीजींचा पुन्हा अवमान
    दरम्यान, नरेशचा भाऊ महेश याने त्याला मारहाण केली. मृताच्या डोक्यावर पाठीमागून काठीने वार केले तसेच मृतकाचा जावई संजय इनवाटे याने हातातील धारदार शस्त्र हिसकावून नरेशवर वार केले, यात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच देवलापार पो ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमी अवस्थेतील नरेशला शासकीय ग्रामीण रुग्णालयात देवलापर येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    साताऱ्यात भीषण दुर्घटना; वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना वायरमनला विजेचा धक्का, गमावला जीव
    मिळालेल्या माहितीनुसार राजाला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो घरात भांडण करत असे. शनिवारी दुपारी तो बहीण कविताला मारण्यासाठी गेला होता. मात्र, तिने तिथून पळून जाऊन स्वतःला वाचवले. रात्री ती पती संजय आणि भाऊ महेश यांना जेवायला बोलवायला गेली होती. त्याचवेळी मद्यधुंद नरेश रस्त्यात संजय व महेश यांच्याशी भांडत होता. नरेशने संजयवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता महेशने त्याच्या डोक्यावर काठीने वार केले आणि संजयने त्याच्या हातातील शस्त्र हिसकावले. काही वेळातच नरेश खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

    Nagpur News : गुंड, ड्रग तस्कर आबू खानच्या अतिक्रमणावर पालिकेचा बुलडोझर, इमारत पाडली
    देवलापार पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी देवलापार ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी आशित कांबळे यांनी रविवारी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी देवलापार पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed