• Mon. Nov 25th, 2024
    इंस्टाग्रामवर जमली गट्टी; नंतर महिलेची ऑनलाईन फसवणूक, डोंबिवलीत खळबळ

    डोंबिवली: बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास आपणास आकर्षक परतावा मिळेल, असे डोंबिवलीतील एका महिलेसह इतर १० जणांना सांगून एका भुरट्याने ऑनलाईन माध्यमातून महिलेसह इतरांची ६ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. गेल्या महिन्याच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. डोंबिवलीतील नूतन यांच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलिसांनी भुरट्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
    अभ्यासात एकदम हुशार, अनेक वर्षांपासून मावशीकडे राहायचा; अचानक संपवलं आयुष्य, कारण….
    पोलिसांनी सांगितले की, ऑनलाईनच्या माध्यमातून एका भुरट्याने ऑलीव्हा ४३ या इंस्टाग्रामच्या माध्यमातून तक्रारदार नूतन यांच्याशी संपर्क साधला. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला अल्पावधीत भरपूर परतावा मिळेल असे सांगितले. अशाप्रकारची माहिती भुरट्याने इतर १० जणांना दिली. अल्पावधीत अधिकची रक्कम गुंतवणुकीवर मिळणार असल्याने ११ गुंतवणूकदारांनी भुरट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन जून, जुलै महिन्याच्या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून गुंतवली.

    मृग गड सर करताना ट्रेकरचा पाय निसरड्या वाटेवरून घसरला; काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

    फसवणूक झालेल्या नतून सावंत यांनी आपल्या बँक खात्यामधून ६ लाख ५४ हजार रुपयांची रक्कम भुरट्याने दिलेल्या बँक खात्यात वळती केली. दोन महिने होत आले तरी आकर्षक परतावा मिळत नाही म्हणून तो मिळण्यासाठी गुंतवणूकदारांनी चोराच्या मागे तगादा लावला. त्याने टाळाटाळ सुरू केली. आकर्षक परतावा नसेल तर किमान आमची मूळ किंमत परत करा, अशी मागणी गुंतवणूकदारांनी सुरू केली. त्यालाही चोराने प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर गुंतवणूकदारांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed