अमरावती: छत्रपती शिवाजी महाराजांनी साकारलेल्या गडकोट संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या अमरावती येथील एका युवकाची आज धक्कादायक एक्झिट झाली. दर्यापूर तालुक्यातील बेंबळा बु येथील सप्तबंधू रोडे कुटुंबातील उज्वल विनोद रोडे (२३) याचे ३० जुलै रोजी निधन झाले. मोबाईल चार्जिंग सॉकेट काढत असताना अचानक त्यातून हाय होल्टेज विद्युत प्रवाह संचारला. त्यानंतर तो क्षणार्धात खाली कोसळला आणि तळमळत असताना कुटुंबीयांनी त्याला तात्काळ परतवाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाबा समोर आली आहे.
उज्वलच्या या अचानक झालेल्या एक्झिटने परिसरात शोककळा पसरली आहे. उज्वल हा कृषी पदवीचे शिक्षण पूर्ण करत पदव्युत्तर शिक्षणाची तयारी करत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळ्यासाठी आवर्जून रायगडाची वारी तो नियमित करायचा. अमरावती आणि अकोला येथे जिल्ह्यात शिवभक्त म्हणून तो सर्वांच्या परिचित होता. आज त्याच्या अंत्यसंस्कारावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

युवकांनी साश्रू नयनाने आपल्या भावना व्यक्त करत उज्वलच्या अचानक जाण्याने संवेदना व्यक्त केल्या. आई-वडिलांना एकुलता एक असलेला उज्वल आपल्या मागे दोन बहिणी आणि आई-वडिल असा आप्त परिवार सोडून गेला आहे. त्याच्या अंतयात्रेत आ. बळवंत वानखडे, सुधाकर भारसाकळे, मनिष कोरपे, सुनिल डिकेंसह मोठया संख्येने ग्रामस्थ शोक यात्रेत सहभागी झाले होते. उज्वलच्या अचानक निधनाने सर्वत्र शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे.