फडणवीस यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. महात्मा गांधींचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याबाबत राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल, असेही फडणवीस म्हणाले.
संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा मी पूर्ण निषेध करतो, असे फडणवीस म्हणाले. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत.देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात त्यांच्याकडे एक महान नायक म्हणून पाहिले जाते.एवढ्या महान नायकाबद्दल असे विधान करणे पूर्णपणे अयोग्य आहे. भिडे गुरुजींनी असे विधान करू नये कारण अशा विधानांमुळे लाखो लोकांचा रोष निर्माण होतो. महात्मा गांधी यांच्या विरोधात बोलणे जनता कदापि सहन करणार नाही. याबाबत राज्य सरकारकडून योग्य ती कारवाई केली जाईल.
काँग्रेसच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा गांधी असोत वा स्वातंत्र्यवीर सावरकर, आम्ही कोणाच्याही विरोधात बोलणे खपवून घेणार नाही. संभाजी भिडे यांचा भाजपशी काहीही संबंध नाही. ते स्वतःची संस्था चालवतात. याला मुद्दाम राजकीय रंग देण्याचे कारण नाही.”
ते पुढे म्हणाले, “संभाजी भिडेंच्या महात्मा गांधींबद्दलच्या वक्तव्यानंतर काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. पण राहुल गांधी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अत्यंत घाणेरडे बोलतात, तेव्हा त्यांचा निषेधही करायला हवा. पण त्यावेळी ते सांसारीक होतात. त्यामुळे महात्मा गांधींचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही.”