• Sat. Sep 21st, 2024

दहशतवाद्यांकडे मुंबईतील ‘छाबड हाऊस’चे फोटो, कुलाब्यात पोलिस बंदोबस्तामध्ये वाढ

दहशतवाद्यांकडे मुंबईतील ‘छाबड हाऊस’चे फोटो, कुलाब्यात पोलिस बंदोबस्तामध्ये वाढ

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राजस्थानमध्ये हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघांच्या झाडाझडतीमध्ये गुगलवरून काढलेले काही फोटो सापडले आहेत. यात कुलाब्यातील ‘छाबड हाऊस’चा समावेश आहे. ही माहिती समोर आल्यानंतर ज्यू नागरिकांचे वास्तव्य असलेल्या ‘छाबड हाऊस’च्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पाऊस: राज्यातील काही जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; मुंबईत कशी असेल पावसाची स्थिती?
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. हे दोघेही राजस्थानमधील रतलाम येथील रहिवासी आहेत. दोघेही सध्या ‘एटीएस’च्या ताब्यात असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या दोघांचा इतर साथीदारांच्या मदतीने राजस्थानमध्ये हल्याचा कट शिजत होता. गुगलच्या माध्यमातून काढण्यात आलेले फोटो आणि त्या ठिकाणांची माहिती या दोघांकडे सापडली आहे. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यादरम्यान दहशवाद्यांनी लक्ष्य केलेल्या ‘छाबड हाऊस’चाही या फोटोंमध्ये समावेश आहे. यावरून दहशतवादी ‘छाबड हाऊस’ला पुन्हा लक्ष्य करण्याची शक्यता असून, याबाबत अधिक माहिती मिळविण्यात येत असल्याचे ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी; गोरेगावहून मुलुंड अत्यंत कमी वेळात पोहोचणार, कारण…
याबाबतची माहिती मिळताच मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. २६/११च्या दहशतवादी हल्यानंतर ज्यू कम्युनिटी सेंटर असलेल्या ‘छाबड हाऊस’मध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त असतो. दहशतवाद्यांकडे पुन्हा या केंद्राचे फोटो आढळल्याने पोलिसांनी ‘छाबड हाऊस’च्या सुरक्षेत अधिक वाढ केली आहे. या परिसरात जाणाऱ्यांची तपासणी केली जात असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सावधगिरी बाळगली जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

वाढदिवशी सुट्टी ऐवजी कर्तव्याला प्राधान्य, आगीचा अनर्थ टळला, पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानाचे कौतुक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed