• Mon. Nov 25th, 2024
    ड्रायव्हरची आई गेली; सांत्वनास निघालो, तोच त्याच्याच निधनाचं वृत्त, आ.अभिमन्यू पवार शोकाकुल

    लातूर : भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या वाहन चालकाचे अकस्मात निधन झाले. विजेचा तीव्र धक्का बसल्याने पवारांच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यानंतर अभिमन्यू पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे ड्रायव्हरच्या आईच्या निधनानंतर अवघ्या दोनच दिवसात त्याचाही दुर्दैवी मृत्यू ओढावला.

    अभिमन्यू पवार यांचे ट्वीट काय?

    भावपूर्ण श्रद्धांजली तुकाराम, तुकारामचं अकाली जाणं माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूपच धक्कादायक आणि दुःखदायक आहे, असं म्हणत अभिमन्यू पवारांनी तुकारामचा फोटो शेअर केला आहे.

    माझा ड्रायव्हर, माझा अत्यंत जीवाभावाचा आणि विश्वासू सहकारी, माझ्या संपूर्ण परिवाराचा अत्यंत विश्वासू ड्रायव्हर, आमच्या कुटुंबाचाच एक भाग असलेल्या तुकाराम नागाळेचा करंट लागून मृत्यू झाल्याचे वृत्त माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी खूपच धक्कादायक आणि दुःखदायक आहे.

    लहान बहिणीचं मोठं मन, कोट्यवधींची संपत्तीही पडेल फिकी; भावासाठी आयुष्यभर पुरणारं दान
    तुकाराम माझ्या कुटुंबाचा खूप मोठा आधार होता, माझं कुटुंब कुठंही प्रवास करत असलं आणि गाडीचं स्टेरिंग तुकारामच्या हातात असलं की मी निश्चिंत असायचो. तुकारामच्या बाजूला एखादी व्यक्ती बसलीय आणि ती खळखळून हसली नाही असं कधीच व्हायचं नाही. माझे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार आणि पक्षातील सहकारी कार्यकर्ते या सर्वांचा तो प्रिय होता.

    जळगावात एसटीला ट्रकची धडक, १३ विद्यार्थ्यांसह २० प्रवासी जखमी

    परवाच त्याच्या आईचे निधन झाले, उद्या मसलाला त्याच्या घरी सांत्वनासाठी जाण्याचे नियोजन होते आणि काही वेळापूर्वी त्याचाच मृत्यू झाल्याचे समजले. भावपूर्ण श्रद्धांजली तुकाराम. माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या स्मरणात तू कायम राहशील. ओम शांती, अशा भावना अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

    कोण आहेत अभिमन्यू पवार?

    अभिमन्यू पवार हे लातूरमधील औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार आहेत. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा अभिमन्यू हे त्यांचे स्वीय सहायक म्हणून रुजू झाले. ते फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. मूळ भाजपचं असलेलं मराठा नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टीने फडणवीसांनी त्यांना २०१९ मध्ये विधानसभेचं तिकीट दिल्याची चर्चा होती.

    प्रियजनांच्या जीवापेक्षा धर्म मोठा नाही, भिन्नधर्मीय महिलांचे एकमेकींच्या कुटुंबीयांना किडनीदान

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed