• Sat. Sep 21st, 2024

Sambhaji Bhide: बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंना अखेर दणका; अमरावतीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sambhaji Bhide: बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंना अखेर दणका; अमरावतीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमरावती : महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त आणि हीन दर्जाचे वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधींजींबद्दल भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विधिमंडळासह राज्यभरातील विविध ठिकाणी आंदोलन करत संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. आता अखेर राजापेठ पोलिसांनी प्रक्षोभक भाषण करणे १५३ कलम अंतर्गत भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

संभाजी भिडे हे अनेकदा बेताल वक्तव्य करून वाद ओढावून घेत असतात. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगल कार्यालयात भिडे यांचे गुरुवारी रात्री व्याख्यान होते. यावेळी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधी यांच्याबद्दलच आक्षेपार्ह वक्तव्य केलं. गांधी यांचे वडील मुसलमान होते, असा अजब दावा त्यांनी केला. महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर भिडेंवर कठोर कारवाईची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे.

Kishor Kadam: संभाजी भिंडेंच्या वक्तव्यावरून वाद; कवी सौमित्र यांचा संताप; अटकेची मागणी करत म्हणाले…

भिडे यांच्या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी व भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. कार्यक्रमस्थळी भिडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

बोलवता धनी कोण: यशोमती ठाकूर

संभाजी भिडे यांच्या जाहीर व्याख्यानात त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आमदार यशोमती ठाकूर यांनी भिडे यांचा बोलवता धनी कोण असा प्रश्न केला. महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.

दंगली घडविण्याचे षड्‌यंत्र : बबलू शेखावत

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाचा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांनी शुक्रवारी जाहीर निषेध नोंदविला. भिडे यांना वादग्रस्त विधान करण्यासाठी भाजपने पुढे केले आहे. राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याचे हे षड्‌यंत्र असल्याचे शेखावत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed