• Mon. Nov 25th, 2024
    मोठा अनर्थ टळला! मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी टँकरला अचानक लागली आग; वाहतूक विस्कळीत

    रायगड: कोकणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात पोळापूर कृषी यांच्या हद्दीत एलपीजी टँकरला मोठी आग लागल्याने खळबळ उडाली आहे. ही आग विझवण्यासाठी महाड परिषदेचा बंब शर्तीच्या प्रयत्न करत होता. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास बंबाला यश आले आहे. या घटनेत टँकर चालक सुखरूप असून हा एलपीजी टॅंकर रिकामा असल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.
    कोकणात ट्रेकिंगसाठी निघाले, दाट धुक्याने तिघांचा घात, वळणावर अंदाज चुकला अन् गाडी थेट…
    या घटनेचे वृत्त कळताच महाड नगरपरिषद प्रशासन पोलादपूर पोलीस पोलादपूर तहसीलदार आदी यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनास्थळापासून दोन्ही बाजूची मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. या टँकरला लागलेली आग रात्री नऊच्या सुमारास विझवण्यात यश आले असून हा टँकर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला आहे. यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली जाणार आहे. या सर्व घटनेवर पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे हे लक्ष ठेवून आहेत.

    बंद दुचाकीमध्ये पेट्रोल टाकताच गाडीच्या इंजिनने घेतला पेट; चालक थोडक्यात बचावला

    या सगळ्या घटनेची खबर महाडचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना देण्यात आल्यानंतर तात्काळ सूत्र फिरवत त्यांनी महाड नगरपरिषदेचा बंब तात्काळ घटनास्थळी रवाना केला. महाड एमआयडीसीचा बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. ही घटना घडली त्यावेळी जर का एलपीजी टॅंकर हा भरलेला असता तर मोठा अनर्थ झाला असता. पण सुदैवाने हा टँकर रिकामा असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. हा टँकर मुंबईकडून गोव्याच्या दिशेने निघाला होता. याचवेळी कशेडी घाटात हा प्रसंग घडला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed