• Sat. Sep 21st, 2024

इर्शाळवाडी नंतर या गावात भूस्खलनाचा प्रकार; ३५ ते ४० घरांचे गाव अखेर स्थलांतरित

इर्शाळवाडी नंतर या गावात भूस्खलनाचा प्रकार; ३५ ते ४० घरांचे गाव अखेर स्थलांतरित

माथेरान: कोकणात पावसाने तीन दिवस थैमान घातले त्यानंतर शुक्रवारी पावसाचा जोर ओसरला असला तरी कोणत्याही क्षणी दरड कोसळतील हे संकट कायम असल्याने माथेरान जवळील येथील गारबट गावाचे स्थलांतर करण्यात आले आहे. पशुधन सोडून आम्ही कसं जाणार? असा सवाल उपस्थित करणाऱ्या ग्रामस्थांची समस्या दूर करण्यात प्रशासनाला यश आले आहे. गावाजवळील शेतजमीन खचली होती आणि भूस्खलनाची शक्यता लक्षात घेता गावकऱ्यांचं स्थलांतर माथेरानच्या पायथ्याशी करण्यात आले. या गावात २५ जुलै पासून भूस्खलनाचा प्रकार समोर येत होता.

प्रशासनाने गाव खाली करून स्थलांतरित होण्याचे आवाहन देखील केले होते. पण पशुपालन मुख्य व्यवसाय असल्यामुळे आपली गुरं, म्हैस, कोंबड्या, बकऱ्या हे पशु कसे राहतील या विवंचनेत नागरिकांनी घरे सोडली नव्हती. अखेर प्रशासनने संपूर्ण परिस्थिती समजावल्यानंतर गावातील लोक तयार झाले. प्रशासनाने त्यांचे स्थलांतर माथेरानमध्ये केले आहे.

पथदिव्यांच्या पोलचा शॉक लागला, लोकांना वाटले दारूडा पडलाय; ठाण्यात तरुणाचा हकनाक बळी
गारबट हे ३५ ते ४० घरांचे गाव असून येथील ग्रामस्थ भातशेती करतात. येथील गावच्या बाजूला लागून असलेली शेतजमीन खचत चालली आहे. १०० फूट लांब आणि ८ ते १० फूट रुंद असा मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे शेतीचा काही भाग वाहून गेला असून शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खालापूर तालुका तहसीलदार आयुब तांबोळी व माथेरानचे तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुपगावचे तलाठी मधुसूदन पामपट्टवार, माथेरानचे पोलीस शिपाई दामोदर खतेले, आपदा मित्र दिनेश सुतार, अक्षय परब, उमेश मोरे यांच्यासह टीमने गारबट गाठून तेथील ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याची विनंती केली. पशुधन सोडून जाऊ शकत नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. मात्र जनावरांना खाद्य देऊन तुम्ही सुरक्षित स्थळी चला, असे सांगताच लोक तयार झाले.

रियान परागकडून ट्रोल करणाऱ्यांना चपराक; वादळी शतकानंतर घेतल्या इतक्या विकेट, षटकारांची संख्या…
स्थलांतरित नागरिकांना माथेरानच्या कम्युनिटी सेंटर येथे स्थलांतर करण्यात आले आहे. मयुर खुळे पुणे, अभिजित धोत्रे कळवा, संतोष शिंगाडे सारसाई या कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली व स्थलांतरासाठी मोठी मदत केली. या कार्यकर्त्यांनी ताडपत्री वगैरे आदी सुविधा या ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले आहेत.

चंद्रपुरातील गावाला पुराचा वेढा, पाणी जानावरांच्या गोठ्यात; रात्री १२ वाजता गावकऱ्याचं स्थलांतर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed