• Sat. Sep 21st, 2024

कुंपणानेच ‘गांजा’ खाल्ला; कळंबा तुरुंगातील पोलीस सुभेदाराकडे सापडला अंमली पदार्थांचा साठा

कुंपणानेच ‘गांजा’ खाल्ला; कळंबा तुरुंगातील पोलीस सुभेदाराकडे सापडला अंमली पदार्थांचा साठा

कोल्हापूर : आपल्याकडे कुंपणानेच शेत खाणे, अशी एक म्हण आहे. त्याचा तंतोतंत प्रत्यय सध्या कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कळंबा कारागृहात सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. दर महिन्याला कारागृहात एखादा मोबाईल किंवा कळंबा कारागृहाच्या भिंतीवरून आत पडणारी गांजाची पाकिटे, चार्जर अशा वस्तू सापडत असल्याने कळंबा कारागृहाच्या सुरक्षेला कोणी वाली आहे का ? असा सवाल उपस्थित होत असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुंपणांनेच शेत खाल्लं ही म्हणी आता प्रत्यक्ष दिसून आली आहे.कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये कार्यरत असणाऱ्या एका सुभेदाराकडेच सुमारे अडीच किलो गांजा सदृश्य अमली पदार्थ सापडला आहे. सुभेदार बाळासाहेब भाऊ गेंड असे संशयिताने नाव असून कारागृहाच्या कर्मचाऱ्याकडेच अमली पदार्थ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सुभेदार बाळासाहेब भाऊ गेंड याला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

साहेब, छापा टाका-माल हाताला लागेल, सूत्राचा DYSP ना फोन, पोलिसांना रेड मारताच…

राज्यभरातील गंभीर गुन्हयातील कैदी कारागृहात बंदिस्त असतात. एकेकाळी मुंबई, पुणे, तळोजा, नागपूर पाठोपाठ कोल्हापुरातील कळंबा कारागृहाच्या कारागृहाची सुरक्षा अव्वल दर्जाची मांडली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कळंबा कारागृहामध्ये मोबाईल सिम कार्ड आणि गांजा सदृश्य अमली पदार्थ आढळून येत होते यामुळे कारागृहाच्या सुरक्षेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत अशातच आज कारागृहाच्या कर्मचाऱ्याकडेच अमली पदार्थ मिळून आले असून बाळासाहेब भाऊ गेंड (वय वर्ष 55) असे या सुभेदाराचं नाव आहे.आज कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झडती घेत असताना सुभेदार यांच्याकडे 1 हजार 710 रुपये किमतीचा 171 ग्राम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ मिळून आला. हा गांजा प्लास्टिक पिशवी आणि त्यावर खाकी टेप लावून पॅकिंग मध्ये होता. पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर संशयीत गेंड जुना राजवाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

लोकप्रिय अभिनेत्रीला पोलिसांनी एअरपोर्टवरच केली अटक; बॅगेतून घेऊन जात होती गांजा

दरम्यान त्याची चौकशी केली असता त्याने पोलिसाना सहकार्य न केल्याने त्याच्या कळंबा येथील घराची झडती घेतली असता या घरात 23 हजार 250 रुपये किमतीचा 2 किलो 325 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ आणि 50 हजार 500 रुपयांची रोकड असा एकूण 73 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे कळंबा कारागृहात प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी कैद्यांकडे गांजा आणि मोबाईल सापडत होता मात्र आता कारागृहाच्या सुभेदाराकडेच अमली पदार्थ मिळून आल्याने कळंबा कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही वर्षात कारागृहात अनेक वेळा मोबाईल, मोबाईल चार्जर आणि सिमकार्ड सापडत होते ह्या सर्व गोष्टी जेल मध्ये कैद्यांकडे कुठून येतात याचा तपास पोलीस घेत होते. मात्र काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हटल्याप्रमाणे कारागृहाची सुरक्षा ज्याच्या खांद्यावर आहेत त्याच कर्मचाऱ्याकडेच गांजा सदृश्य अमली पदार्थ आढळून आल्याने कळंबा कारागृहाची सुरक्षा भेदण्यासाठी घरचा भेदी काम करत असल्याचे सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed