• Sat. Sep 21st, 2024

प्रशासनाचे मोठे पाऊल, दरडींपासून धोका असलेल्या ५७१ कुटुंबे व १७०१ लोकांचे स्थलांतर

प्रशासनाचे मोठे पाऊल, दरडींपासून धोका असलेल्या ५७१ कुटुंबे व १७०१ लोकांचे स्थलांतर

रत्नागिरी : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कोकणातील जिल्हा प्रशासनांनी कंबर कसली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रशासनही सक्रिय झाले असून भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या सर्व्हे नुसार १८१ दरड प्रवण गावे असून त्यांचे चार वर्ग करण्यात आले आहेत. वर्ग १ मध्ये १२ गावे, वर्ग २ मध्ये ३ गावे, वर्ग ३ मध्ये ७९ गावे व वर्ग ४ मध्ये ४६ गावांचा समावेश आहेत. या १८१ पैकी २३ गाव, ५७१ कुटुंब, १७०१ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच ५० पुरप्रवण गावे असून त्यापैकी २४ गाव, १३० कुटुंब, ४७७ लोकांना स्थलांतरीत केले असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा परिषद कृषी अधिकारी शेंडे, आदी अधिकारी उपस्थित होते.
छातीत दुखतंय; ५५ वर्षीय व्यक्ती धावत्या बसमध्ये खाली कोसळली, नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी वाचवला जीव
यावर्षी आपत्ती काळात राजापूर येथील श्री शेळके या रिक्षा चालकावर झाड पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना शासकीय नियमानुसार तात्काळ १९ जुलै रोजी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. तसेच अन्य ३ जखमी महिलांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

तिवरे धरणाच्या बाबतीत आत्ता पर्यंत २४ घरे सिद्धिविनायक ट्रस्टच्या मदतीने बांधून देण्यात आली आहेत. उर्वरित ३० घरे सिडको अंतर्गत बांधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
VIDEO : मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा; सुषमा अंधारेंचा राज्य सरकारवर खळबळजनक आरोप
अतिवृषटीमुळे जिल्ह्यातील २ अंगणवाडी, १६ प्राथमिक शाळा, ५६ साकव, १ आरोग्य उपकेंद्र यांचे नुकसान झाले आहे. १९२ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. ३४ गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. ३० सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे.
कृषी विभागाची माहिती देत असताना भात व नाचणीचे जमीन क्षेत्र ७९००० हेक्टर असून पैकी ६८००० हेक्टर भात लावणीचे क्षेत्र आहे तर १०३९८ हेक्टर नाचणी पिकाचे क्षेत्र आहे. पैकी यावर्षी भात पेरणी ७०.८८ टक्के एवढी झाली आहे तर नाचणी पेरणी ३८ टक्के एवढी झाली आहे.
रिलायन्सच्या ३६ लाख गुंतवणूकदारांसाठी मोठी खुशखबर, शेअरचे नवे टार्गेट पाहून बसेल धक्का
सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील अतिवृष्टिमुळे ५२ गाव, ४८.५ हेक्टर जमीन क्षेत्र व २०१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed