Ganeshotsav Spacial Train: गणेशोत्सवादरम्यान अतिरिक्त गर्दी कमी कोकण रेल्वेकडून विशेष अनारक्षित रेल्वेगाडीची घोषणा
गणेशोत्सवादरम्यान अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण आणि मध्य रेल्वेने चाकरमान्यांसाठी विशेष अनारक्षित रेल्वेगाडीची घोषणा केली आहे.
असे असणार Timetable
१) गाडी क्र. ०११०३ / ०११०४ मुंबई सीएसएमटी – कुडाळ – मुंबई सीएसएमटी विशेष
२) गाडी क्र. ०११०३ मुंबई सीएसएमटी – कुडाळ विशेष, सीएसएमटी येथून ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबरला दुपारी ३.३० वाजता सुटणार आहे. जी कुडाळला दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पोहोचेल
३) गाडी क्र. ०११०४ कुडाळ – मुंबई सीएसएमटी विशेष, कुडाळ येथून ५ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:३० वाजता सुटेल आणि सीएसएमटीला त्याचदिवशी दुपारी ४.४० वाजता पोहोचेल.
थांबे – दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग