सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत घेतली आहे. राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. जोरदार असे कॅप्शन राऊत यांनी या ट्विटला दिले आहे. या मुलाखतीचा पहिला भाग बुधवार दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता प्रसारित केला जाणार आहे. तर दुसरा भाग हा शुक्रवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ वाजता प्रसारित होईल.
या मुलाखतीतलं संभाषण जसंच्या तसं…
संजय राऊत : वर्षभरापूर्वी अशाच मुसळधार पावसामध्ये तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं होतं.
उद्धव ठाकरे : वाहून नव्हतं गेलं, खेकड्यांनी धरण फोडलं होतं.
संजय राऊत : ते असं म्हणत आहेत, देवेंद्र फडणवीस की, उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला
उद्धव ठाकरे : मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की जेणेकरुन तुम्ही राष्ट्रवादी तोडली? उठसूट दिल्लीला मुजरा मार ही आपली संस्कृती नाहीय.
संजय राऊत : लोकशाही वाचणवणार का?
उद्धव ठाकरे : लोकशाही साधा माणूस वाचवणार.
उद्धव ठाकरे : बाबरीच्या वेळेला जबाबदारी घ्यायला नव्हता. राम मंदिराचा निर्णय तुम्ही घेतला नाही. मग राम मंदिराचं श्रेय कसं घेऊ शकता?”, असा सवाल उद्धव ठाकरे या मुलाखतीत भाजपला करताना दिसत आहेत. “देशावर जो प्रेम करतो. देशासाठी जो मरायला तयार आहे तो हिंदू आहे. माझा देश माझा परिवार आहे हे माझं हिंदुत्व.
उद्धव ठाकरे : आज माझ्याविरुद्ध अख्खा भाजप आहे, तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरेची भिती का वाटते? उद्धव ठाकरे एकटा व्यक्ती नाही आहे. उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत. आणि मला संपवण्यात तुम्हाला आनंद असेल ना संपवा. बघू ना मग माझ्या वडिलांचे आशिर्वाद, माझ्या जनतेची सगळी साथसोबत आणि तुमची ताकद.