अंत्यसंस्कारासाठी जेव्हा यल्लप्पा मग्रुमखाने यांचे मृतदेह सोरेगाव स्मशानभूमीत आणण्यात आले. पथदिवे बंद असल्याने आणि अंत्यसंस्कार ठिकाणी लाईट नसल्याने मृत यल्लप्पा मग्रुमखाने यांच्या मृतदेहावर दुचाकी लाईटच्या फोकसमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. सोरेगाव स्मशानभूमीत पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने अथवा असतील तर ते बंद स्वरुपात आहेत. मग्रुमखाने कुटुंबियांना हालअपेष्टा सहन करत अंत्यसंस्काराचे विधी उरकावे लागले. विविध कर स्वरुपात सोलापूरकर महानगरपालिकेत रोख आणि ऑनलाइन मार्फत रक्कम जमा करत आहेत.
सोलापुरातील विविध स्मशानभूमीत विकासाच्या नावाने अजूनही बोंबाबोंब असे चित्र पहायला मिळत आहे. पथदिवे बंद असल्याने मृत यल्लप्पा मग्रुमखाने यांच्या मृतदेहावर दुचाकी लाईटच्या फोकस मध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. सोरेगाव हा सोलापूचा प्रमुख असा हद्दवाढ भाग आहे. हा भाग प्रभाग २३ मध्ये येतो. संबंधित माजी नगरसेवक आणि नगरसेविका याबाबत बेफिकीर असल्याचेच दृश्य स्पष्टपणे जाणवते. अशा माजी नगरसेवक अथवा नगरसेविका यांना येणाऱ्या महापालिका निवडणूकीत चांगलीच अद्दल घडवणार असल्याची तटस्थ भूमिका आता सोरेगाव येथील नागरिकांनी घेतली आहे. लवकरच सोरेगाव स्मशानभूमीत सोलापूर महापालिका प्रशासनाकडून विकास कामांची सुधारणा न झाल्यास येणाऱ्या काही दिवसांत सोलापूर महापालिकेवर तिरडी मोर्चा काढू, असा आक्रमक पवित्रा सोरेगाव येथील नागरिकांनी घेतला आहे.