दोनवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पा अंतर्गत प्रकल्पात सतत होत असलेल्या पर्जन्यवृष्टी मुळे धरणाच्या जलाशयात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने विसर्ग चालू असताना देखील सततच्या पर्जन्यामुळे जलाशय पातळीमध्ये मोठी घट होत नसल्याने या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यांना तत्काळ पाळीव प्राण्यांसह स्थलांतराच्या सूचना देण्यात आले आहेत.
आंबोली घाटात पाणी जाण्यासाठी गटाराची कोणती व्यवस्था नसल्याने तो पावसात वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचे मत येथील ग्रामस्थांनी व्यक्त केल आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातही नुकसान झाले असून एका घराचे मोठे नुकसान झालं आहे. कोंडकारुळ येथील संजीव तुकाराम असगोळकर यांच्या घराचा पाया खचून घराचे मोठे नुकसान झाला असून घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा कोणी ही जखमी झालेले नाही अशी माहिती गुहागर तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती वराळे यांनी दिली आहे.
दोनवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पा अंतर्गत प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामधून पणदूर-घोटगे रस्ता जात आहे, प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे प्रकल्पाच्या जलाशयाचे पाणी सदर रस्त्यावर आले आहे. मालमत्ता, चिजवस्तू, वहाने, जनावरे, पाळीवप्राणी व शेती अवजारे इत्यादी साधन सामग्री सुरक्षित स्थळी हलविणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
मळगाव जाधववाडी येथील सुमारे १०० वर्षापूर्वीचे सिद्धिविनायक मंदिर देवस्थान वर पडला. त्यामुळे लगत असणारे स्टीट लाइट पोल पडले यामध्ये चंद्रकांत जाधव यांच्या स्वच्छता गृहावर पडला. ओटवणे रमाईनगर येथे उत्तम जाधव यांचे राहत्या घराचे वाशे मोडल्यामुळे घराला धोका निर्माण झाला आहे. सातोसे देऊलवाडी रस्त्यालगत असलेल्या विजेच्या तारेवर झाड पडून लाईट बंद झाली व रस्ता बंद होता.आंबेगांव ते माणगाव कडे जाणाऱ्या मार्गांवर (आंबेगांव सीमेजवळ) घळण कोसळू माती आणि झाड रस्त्यावर पडले होते.
माती रस्त्यावर येऊन अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. चौकुळ गोणसाटवाडी जि.प.शाळा संरक्षक भिंत पडली. आंबोली घाट रस्त्यावर कोसळलेले झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात आला. या सगळ्यावर सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांचे प्रशासन लक्ष ठेवून आहे.