• Mon. Nov 25th, 2024
    गरजू म्हणून कामावर ठेवलं, मालकानं काम बघून विश्वास टाकला, अधिकार देताच लाखोंना गंडा

    छत्रपती संभाजीनगर: मालकाने विश्वासाने व्यवसाय सोपवला मात्र कर्मचाऱ्यानं मालकाचा विश्वासघात करत तब्बल १४ लाख २८ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. ही बाब मालकाच्या लक्षात येतात या प्रकरणी सिडको पोलिसांमध्ये कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद मुरलीधर दाभाडे वय ३० रा.नामांतर कॉलनी एन १२ असे आरोपीचे नाव आहे.

    या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद पद्माकर धाडबळे वय ५१ रा. एन १२ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनोद यांचे टीव्ही सेंटर भागामध्ये एसबीआय ग्राहक सेवा केंद्र आहे. दरम्यान २०१६ साली विनोद यांनी शरद याला दुकानावर कामावर ठेवलं. यावेळी कामाची गरज असल्याने मन लावून काम करत विनोद यांचा विश्वास संपादित केला. यावेळी शरदचा प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची इच्छाशक्ती बघून विनोद यांनी शरदचा पगार वाढवला. तसेच व्यवसायाचे अधिकारही दिले.
    सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा सुपडा साफ, आता पाकिस्तानचा नंबर; रविवारी होणार IND vs PAK हाय व्होल्टेज फायनल मॅच
    शरद याने विश्वास जिंकल्यानंतर विनोद यांनी व्यवसायाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर ते एसटी महामंडळाची तिकीट बुकिंग चे काम व मुंबई येथील नापतोल कंपनीचे पोहोचवण्याचे कंत्राट घेऊन काम करू लागले. मात्र याच वेळी विनोद यांच्या विश्वासाचा घात झाला. शरदने विनोद यांनी विश्वास ठेवल्याचा फायदा घेतला. मालकाने दिलेल्या अधिकारांचा गैरफायदा घेत व्यवसायामध्ये अफरातफर करायला सुरुवात केली. दरम्यान २०१७ ते २०२२ दरम्यान शरद याने व्यवसायातून तब्बल २२ लाख २८ हजार ६६० रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवून घेतले.

    दरम्यान व्यवसायामध्ये पैसे कमी येत असल्यामुळे विनोद यांनी व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. व्यवसायामध्ये बारकाईने लक्ष घातला असता व्यवसायात घोटाळा होत असल्याचे विनोद धाडबळे यांच्या लक्षात आलं.
    मोठी बातमी: राज्यातील ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढेंची दीड महिन्यात पुन्हा बदली, संपूर्ण यादी
    दरम्यान, धाडबळे यांनी सर्व गोष्टीची खात्री करून या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यामध्ये कर्मचारी शरद दाभाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार करत आहेत. शरद दाभाडेवर पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागलं आहे.

    … आता रडून काय फायदा, जय शहा यांनी अर्ध्या तासांतच केला पाकिस्तानचा गेम, पाहा काय घडलं…

    घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed