• Sat. Sep 21st, 2024

इर्शाळवाडीत मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी किती जण? अंदाज येईना, आता पोलीस वापरणार ही ट्रिक

इर्शाळवाडीत मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी किती जण? अंदाज येईना, आता पोलीस वापरणार ही ट्रिक

रायगड: खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या गावावर बुधवारी रात्री दरड कोसळली होती. या दुर्घटनेत जवळपास संपूर्ण गाव क्षणार्धात डोंगराखाली गाडले गेले. अत्यंत उंचावर आणि दुर्गम भागात असलेल्या इर्शाळवाडी गावात अत्याधुनिक यंत्रसामुग्री पोहचणे शक्य नसल्याने एनडीआरएफच्या जवानांना मर्यादित साधनांसह बचावकार्य करावे लागत आहे. एनडीआरफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफची पथकं गुरुवारी पहाटेपासून मातीचा ढिगारा उपसण्याचे काम करत आहेत. मात्र, याठिकाणी तब्बल १५ ते २० फुट मातीचा ढिगारा असल्याने बचावकार्यासाठी वेळ लागत आहे. आतापर्यंत या ढिगाऱ्याखालून २२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, दुर्घटना घडली तेव्हा इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त घरांमध्ये नेमके किती जण होते, याचा शोध अद्याप लागलेला नाही. इर्शाळवाडीतील अनेकजण शेतीच्या कामासाठी किंवा मासेमारीसाठी बाहेर जातात. त्यामुळे दुर्घटनेच्या दिवशी घरांमध्ये किती लोक होते, याचा नेमका आकडा अद्याप कळू शकलेला नाही. परिणामी एनडीआरएफच्या पथकांना आणखी किती लोकांना बाहेर काढायचे आहे, याचा अंदाज येऊ शकलेला नाही. त्यामुळे आता पोलिसांकडून एक क्लृप्ती वापरली जाणार आहे.

इर्शाळवाडीत ३६ तासानंतर महिलेला जिवंत बाहेर काढलं, पण निर्गुडे कुटुंबीयांचा आनंद क्षणात मावळला

मातीच्या ढिगाऱ्याखील नेमके किती लोक आहेत, याचा अंदाज घेण्यासाठी पोलिसांकडून इर्शाळवाडीतील लोकांचे शेवटचे मोबाईल लोकेशन तपासले जाणार आहे. जेणेकरून संबंधित लोकांना ट्रेस करणे शक्य होईल, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. आम्ही इर्शाळवाडीतील मोबाईल वापरत असलेल्या लोकांचा डेटा जमा करत आहोत. सध्या इर्शाळवाडीतील इतर लोकांना पायथ्याशी असलेल्या बेस कॅम्पवर ठेवण्यात आले आहे. याठिकाणी असलेल्या मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांचे सांत्वन करुन आम्ही त्यांच्याकडून शक्य तितकी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेकजण दु:खात आहेत. तरीही आम्ही शक्य ते प्रयत्न करुन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क का होत नाही? त्यांचा मोबाईल बंद आहे का, याबाबत विचारणा करत आहोत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आमची सायबर टीम संबंधित मोबाईल फोनचे लास्ट लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती सोमनाथ घार्गे यांनी दिली.

Irshalgad Landslide: गावाचा रस्ता चढताना एका पॉईंटला मलाही वाटलं की…. एकनाथ शिंदेंनी सांगितला तो अनुभव

दरम्यान, आज अंधार पडल्यानंतर इर्शाळवाडी येथील बचाव कार्य थांबवण्यात आले आहे. उद्या पुन्हा सकाळी हे बचाव कार्य हाती घेण्यात येणार आहे. मात्र अद्यापही या दरडीखाली अजून सुमारे १०० जण असतील अशी मोठी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज दिवसभर करण्यात आलेल्या बचाव कार्यात सहा मृतदेह हाती लागले आहेत त्यामुळे आता मृतांची संख्या २२ वरती गेली आहे.

दरड कोसळून उद्धवस्त झालेलं इर्शाळवाडी गाव नेमकं कसं होतं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed