याबाबत मार्केटयार्ड परिसरातील कांदा व्यापारी स्वप्नील भगवान बेल्हेकर (वय ३१, रा.दत्तनगर,नऱ्हे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २०२१ मध्ये हा प्रकार घडला आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी आहे की, व्यवसायानिमित्त बेल्हेकर यांची सिद्धाप्पा भंडारी आणि गजेंद्र सिद्धाप्पा यांच्याशी ओळख झाली होती. आम्ही कांद्याचे मोठे व्यापारी आहोत आणि तुमचा माल परदेशात विकून मोठा नफा करून देतो, असे या दोघांनी बेल्हेकर यांना सांगत त्यांचा विश्वास संपादन केला.
व्यवसायाच्या नावाखाली दोघांनी मिळून बेल्हेकर यांच्याकडून ४६ लाख रुपयांचा माल घेतला. कांद्याचे पैसे मागितल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना धमकावण्यास सुरवात केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर सिद्धप्पा भंडारी याने अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जास सरकारी वकील मकरंद औरंगाबादकर यांनी विरोध केला. फिर्यादी यांच्यावतीने ॲड. शिवम पोतदार यांनी कामकाज पाहिले.
व्यापाऱ्याला न्याय कधी मिळणार ?
पुण्यातील व्यापाऱ्याचे तब्बल ४६ लाखांची फसवणूक झाली आहे. कर्नाटक राज्यातील दोघांनी त्यांची फसवणूक केली आहे. आरोपी जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांसमोर हजर होणार की वरच्या न्यायालयात दाद मागणार हे पाहावं लागेल. दरम्यान, या फसवणुकीच्या घटनेनं व्यापाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करताना सतर्कता बाळगणं आवश्यक आहे हे अधोरेखित झालं आहे.
