सिंहासन पूजा नोंदणी दि.२१ जुलै रोजी सकाळी १०.०० वा.पासून ते २६ जुलै पर्यंत सकाळी १०.०० वा.पर्यंत करता येईल. ऑनलाइन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस दि.२६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत पाठविण्यात येईल.
भाविकांना प्रथम सोडतीचे ऑनलाइन पेमेंट २६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून ते २७ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत करता येईल. सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाइन ड्रॉ पध्दतीने द्वितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस दि.२७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत पाठविला जाणार आहे.
भाविकांना द्वितीय सोडतीचे ऑनलाइन पेमेंट दि.२७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून ते दि.२८ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत करता येईल. प्रथम व द्वितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाइन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस दि. २८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत पाठविण्यात येणार आहे.
भाविकांना तृतीय सोडतीचे ऑनलाइन पेमेंट दि.२८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून ते २९ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत करता येईल. माहे जुलै २०२३ या महिन्यातील अंतिम सिंहासन पूजा बुकींग झाल्याची यादी दि.२९जुलै रोजी सायंकाळी ०५.०० वाजता प्रसिध्द करण्यात येईल.
भाविकांनी सिंहासन पूजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळावरुन सिंहासन पूजा पास बुकींग या मेन्यूवर क्लिक केल्यानंतर या लिंकवर प्रवेश करुन भाविकांनी आपली सिंहासन पूजेची नोंदणी करावी आणि सिंहासन पूजा नोंदणीचा लाभ घ्यावा, असे श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.