शहरातील पिंपळगाव परिससरातील माजी सरपंच देसाई यांचा भाऊ जयप्रकाश उर्फ नितीन देसाई हा तिरूपती सोसायटीत कुटूंबीयांसह राहत असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते. जयप्रकाश देसाई यांचे पिंपळगाव मार्गावर एक दुकान असून ते दुकान त्यांनी डॉ. संतोष गोफणे यांना क्लीनीकसाठी भाड्याने दिले होते. अश्यात जुलै २०२२ मध्ये डॉ. गोफणे यांना श्रावण राठोड आणि त्याच्या मित्राने मारहाण केली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून पोलिसात गुन्हे नोंद करण्यात आले होते. जयप्रकाश उर्फ नितीन देसाई यांच्यामूळेच आमच्यावर पोलिसात गुन्हे नोंद झाल्याचा समज सावन राठोड आणि त्याच्या मित्रांना झाला होता. त्यामूळे ते जयप्रकाश उर्फ नितीन देसाई याच्यावर राग धरून होते.
रविवारी रात्रीच्या सुमारास सावन राठोड आणि त्याच्या इतर दोन मित्रांनी त्या रागाच्या कारणावरून जयप्रकाश उर्फ नितीन देसाई यांना मारहाण केली. तसेच त्याच्या धारदार शस्त्राने वार करीत हत्या केली. या प्रकरणी पुतन्या मयूर देसाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता एलसीबी पथकानी मारेकऱ्यांची शोधमोहीम राबवून दोघांना चार तासातच अटक केली.
ही कारवाई एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने, सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख, संतोष मनवर, पथकातील बंडु डांगे, सैयद साजीद, रूपेश पाली, अजय डोळे, विनोद राठोड, निलेश राठोड, रितुराज मेडवे, धनंजय श्रीरामे, जितेंद्र चौधरी यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास शहर ठाणेदार सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय आत्राम करीत आहे.
पुतण्या येताच आरोपी पळाले …
विश्वकर्मा नगरजवळील महादेव मंदिराजवळ जयप्रकाश उर्फ नितीन देसाई यांना सावन राठोड आणि त्याचे मित्र मारहाण करीत असल्याची माहिती पुतन्या मयूर देसाई याला मिळाली होती. त्यावरून मयूर याने चारचाकी वाहन घेवून त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी पुतन्या मयूरला पाहून सावन राठोड, बिल्ला काळे आणि रोहीत मरकाम यांनी पळ काढला. दरम्यान पुतन्याच्या परिसरातील नागरिकांच्या मदतीने काका नितीन देसाई यांना शासकीय रूग्णालयात दाखल केले.