• Mon. Nov 25th, 2024

    वाढदिवसाचं सेलिब्रेशन करुन निघाले, वाटेत चहापाणी झाला, शिवाई बसची धडक अन् सगळं संपलं

    वाढदिवसाचं सेलिब्रेशन करुन निघाले, वाटेत चहापाणी झाला, शिवाई बसची धडक अन् सगळं संपलं

    छत्रपती संभाजीनगर: पुण्यात मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून गावी परतत असताना धाब्यावर चहापाणी घेऊन कारमध्ये बसले असतानाच पाठीमागून आलेल्या शिवाई इलेक्ट्रिक बसने ब्रेझाला जोरदार धडक दिली. या धडकेत एक जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवार १७ जुलैला नगर रोडवरील लिंबे-जळगाव जवळ घडली.
    माळशेज घाटात इन्होवा व नॅनो कारची समोरासमोर धडक; अपघातानंतर इन्होवा ३० फूट ओढ्यात कोसळली
    याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद जावेद सय्यद हबीब (३३ रा. देऊळगाव मही) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर बबलू पठाण (२५), समीर शेख (२५), वसीम शेख (३०), कारचालक कलीम खान (३५ रा. सर्व देऊळगाव मही) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. दरम्यान देऊळगाव मही येथुन हे पाच मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी ब्रेझा कारने पुण्याला गेले होते. पुण्यात सय्यद जावेद सय्यद हबीब याचा वाढदिवस केल्यानंतर हे सर्व मित्र मध्यरात्री देऊळगाव मही कडे परत निघाले. लिंबे जळगाव जवळील टोल नाक्याच्या जवळ असलेल्या एका धाब्यावर ते सर्वजण थांबले.

    कार रस्त्यालगत उभी करून हे थांबले असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या शिवसाई इलेक्ट्रिक बसने त्यांना जोरदार धडक दिली. त्या धडकेत रोडवर उभी कार बाजूच्या शेतात जाऊन पडली. अपघातानंतर शिवाई बस चालकाने बस उभी केली नाही. बस तशीच पुढे नेली. अपघाताच्या जोरदार आवाजाने आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावून आले. तर काहींनी वाळूज पोलिसांना कळविले. अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घाटी रुग्णालयात हलविले. मात्र गंभीर जखमी सय्यद जावेदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    माळशेज घाटात इनोव्हा – नॅनो कारची धडक; इनोव्हा ओढ्यात कोसळली

    दरम्यान या भीषण अपघातानंतर एसटी महामंडळाच्या शिवाय बसचा बस चालक घटनास्थळावरून पसार झालं होता. दरम्यान पळून गेलेल्या बस चालकाला वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर बस ही वाळूज पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed