• Sat. Sep 21st, 2024
पायाला दुखापत; मात्र जिद्द हरली नाही, १२ वर्षांनंतर ५० वर्षाचा अवलिया देतोय तरुणांना जिमचे धडे

इंदापूर: अनेकांना अनेक प्रकारचे छंद असतात. हा छंद जोपासण्यासाठी ते जीवापाड प्रयत्न करत असतात. असाच एक व्यायामाची आवड असणारा पन्नाशी पार केलेला एक अवलिया बॉडी बिल्डर सध्या सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्धीच्या झोकात असल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील सुधीर देशमाने असं या अवलियाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर देशमाने हे गेली तीन दशकाहून अधिक काळापासून इंदापूर फिटनेस क्लब नावाने स्वतःची जिम चालवतात. या जिम मध्ये ते स्वतः व्यायाम करून सुमारे २०० ते २५० मुलामुलींना ते व्यायामाचे प्रशिक्षण देतात. वयाची पन्नाशी पार केलेले देशमाने हे या वयातही जिममधील विविध प्रकारचे हार्ड व्यायाम करतात. गळ्यात पाच पाच किलोच्या तीन लोखंडी साखळ्या अडकवून ते व्यायाम करताना दिसून येतात. अशाप्रकारे व्यायाम केल्याने मानेच्या शिरांचा चांगला व्यायाम होत असल्याचे ते सांगतात.
प्रियाची बॉडी बिल्डिंगमध्ये देशासाठी सुवर्ण कामगिरी, पण दलित असल्याने होतोय भेदभाव
लहानपणापासूनच व्यायामाची आवड असणाऱ्या देशमाने हे १९९० पासून जिमकडे वळले. ११९० ते २०१२ सालापर्यंत त्यांनी भरपूर व्यायाम केला. दरम्यान दुर्दैवाने त्यांच्या पायाला दुखापत झाली. लोखंडी रॉड त्यांच्या पायात लावण्यात आला. अपघातानंतर एक तप म्हणजे तब्बल बारा वर्ष व्यायामात खंड पडला. मात्र उपजतच व्यायामाची आवड असल्याने ते या अपघातातून सावरत पुन्हा नव्या जोमाने त्यांनी व्यायामाला सुरुवात केली.

मिस्टर इंडियाने सांगितलेल्या आठवणीने पाणावले राखीचे डोळे

देशमाने यांच्या जिममधून प्रशिक्षण घेतलेले अनेक मुलं मुली बॉडी बिल्डिंग क्षेत्रात गेले. आज पन्नाशी पार केलेल्या पांढरी तुळतुळीत दाढी असणाऱ्या सुधीर देशमाने यांच्याकडे शेकडो मुले मुली प्रशिक्षण घेत आहेत. आहाराबाबत चिकन, मासे, हिरव्या पालेभाज्या खात असल्याचे ते सांगतात. आहार चांगला असेल तर शरीरही चांगले राहते. सोबत व्यायाम आहेच. त्यामुळे अजूनही ३० ते ३५ वर्ष आता आहे. त्याच जोमाने राहू, असा विश्वासही ते व्यक्त करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed