• Sat. Sep 21st, 2024

फडणवीसांच्या विश्वासू आमदाराच्या मतदारसंघावर दावा, शिंदेंच्या शिलेदारानं टेन्शन वाढवलं

फडणवीसांच्या विश्वासू आमदाराच्या मतदारसंघावर दावा, शिंदेंच्या शिलेदारानं टेन्शन वाढवलं

सोलापूर:सोलापुरातील बार्शी मतदारसंघ अतिशय महत्वाचा मानला जातो.अपक्ष आणि भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत हे सध्या बार्शी तालुक्यात विद्यमान आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसनेचे बार्शी तालुकाप्रमुख भाऊसाहेब आंधळकर यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील आमदार राजेंद्र राऊत यांसमोर आव्हान उभे केले आहे.बार्शी मतदारसंघ हा सुरुवातीपासून शिवसेनेचाच आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांकडे विनंती करून शिवसनेची उमेदवारी प्राप्त करणार असल्याची माहिती भाऊसाहेब आंधळकर यांनी माहिती दिली.बार्शी मतदार संघ नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहतो,आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप ,राष्ट्रवादी ,व शिवसेना गटाचा नेमका उमेदवार कोण याकडे मात्र लक्ष लागून राहिले आहे.

आमदार राजेंद्र राऊतांसमोर भाऊसाहेब आंधळकरांचे आव्हान

बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळचे आणि मर्जीतील आमदार म्हणून ओळखले जातात.देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरकार स्थापन होण्याअगोदर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीतील प्रसिद्ध अशा भगवंत मंदिरात जाऊन साकडं घातले होते.आमदार राजेंद्र राऊत आणि देवेंद्र फडणवीसांचे कौटुंबिक संबंध आहेत.
खळबळजनक! बीडचा पुरातन नंदी सापडला, मंदिरातून धरणात आला कसा? तपास सुरू
बार्शी तालुक्यातील एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख आणि माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी राजेंद्र राऊतांविरोधात आव्हान उभे केले आहे. भाऊसाहेब आंधळकर आणि राजा राऊत यांच्या मधून विस्तव देखील जात नाही.मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप नेते आणि शिंदे गट शिवसेनेचे नेते एकमेकांना सोबत घेत निवडणूका लढणार की एकमेकांविरोधात उभे ठाकणार हे पाहण्यासारखे आहे.
मोठी बातमी: अजितदादा सर्व आमदारांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला, आणखी एका भेटीने राजकीय तर्कवितर्कांना उधाण

बार्शीतील गुन्हेगारी मोडीत काढणार : भाऊसाहेब आंधळकर

शिवसेनेचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर पोलीस सेवेत अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत.निवृत्तीनंतर त्यांनी बार्शीत शिवसेनेमधून समाजकारण सुरू केले.महाविकास आघाडीची सत्ता जाऊन देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर भाऊसाहेब आंधळकर यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला.आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.बार्शीमध्ये गुन्हेगारी मोठी वाढली आहे,अनेक नवयुवकांवर गुन्हे दाखल होतं आहेत. बार्शी मधील काही राजकिय नेते या तरुणांचा दुरुपयोग करत आहेत,ही गुन्हेगारी मोडीत काढणार असल्याची माहिती भाऊसाहेब आंधळकर यांनी बोलताना दिली.

अजितदादांच्या गटाचे नाना प्रयत्न, पण बैठकीत शरद पवारांचा थंड प्रतिसाद, बाहेर येताच प्रफुल पटेल म्हणाले…

शिंदे गटाच्या नेत्याने वाढवल्या फडणवीसांच्या खास आमदाराच्या अडचणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed