• Mon. Nov 25th, 2024

    देवदूत होऊन आला, अपघातग्रस्तांचा जीव वाचवला अन् मग तिथेच त्याच्यासोबत अनर्थ घडला…

    देवदूत होऊन आला, अपघातग्रस्तांचा जीव वाचवला अन् मग तिथेच त्याच्यासोबत अनर्थ घडला…

    नांदेड: अपघातानंतर जखमीच्या मदतीला धावून आलेल्या एका तरुणाला सिमेंटच्या ट्रेलरने चिरडले. या अपघात ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. लोहा तालुक्यातील सोनखेड परिसरातील खरबी फाटा जवळ शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. शेख अफजल असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

    शनिवारी मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास कोबीने भरलेला बोलेरो पिकअप गाडी नांदेड कडे येतं होती. सोनखेड रोडवरील खरबी फाटा येताचं वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. यावेळी वाहनात बसलेले चालकासह तीघे जण जखमी झाले. ही माहिती मिळाल्यानंतर देगलूर नाका येथील रहिवासी शेख अफजल हा मदतीसाठी घटनास्थळी पोहचले. यावेळी अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. त्यानंतर बोलेरो पिकअप गाडीमधील गोबी इतर वाहनामध्ये भरण्यासाठी रोडच्या कडेला थांबले. यावेळी यवतमाळकडे जाणाऱ्या सिमेंटच्या ट्रेलरने त्या तरुणास चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

    क्रिकेट खेळताना अचानक कोसळला अन् २० वर्षांच्या पर्वची चटका लावणारी एग्झिट
    घटनेनंतर सोनखेड पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. बोलेरो पिकअप पलटी जखमी झालेल्या तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघातातील जखमी हे मयताचे नातेवाईक होते. ज्यांच्या मदतीसाठी धावून आला, त्याचाच नियतीने घात केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबियामध्ये शोककळा पसरली आहे.

    तरुणीवरील हल्ल्याने पुणे सुन्न! बचावास गेलेले अनेक जण जखमी; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

    रात्रीच्या वेळी अवैध वाहतूक वाढली

    नांदेड शहरासह जिल्ह्यात रात्रीच्या वेळी अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. असर्जन, विष्णुपुरी परिसरात रात्रीच्यावेळीच नाही तर दिवसाही वाळू उपसा, वाहतूक सुरूच असते. जिल्हा प्रशासनाने कारवाई करून ही वाळू माफियांवर फरक पडत नसल्याचे चित्र आहे. नियमित कारवाई झाल्यास अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा बसण्यास मदत होईल. शिवाय, अपघाताचे प्रमाण घटण्यास मदत होईल, असे नागरिकांमधून सांगितले जाते.

    शेतात काम करताना खजिना सापडला, एका क्षणात त्याच्या आयुष्याचं ‘सोनं’ झालं!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *