• Sat. Sep 21st, 2024
दादांचे मंत्री पवारांना भेटले, रोहित पवारांचं ट्विट-काहींची नक्कीच झोप उडाली असेल!

मुंबई : अजित पवार यांच्या बंडाने राज्यातली राजकीय परिस्थिती पूर्णत: बदलून गेली आहे. कालपर्यंत शिंदे गटाला गद्दार म्हणणारेच आज भाजपच्या साथीला जाऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेत. त्यामुळे जनतेच्या मनात रोष असल्याचं अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटातील मंत्र्यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. भेटीला ४ तास पूर्ण होत नाही, तोच रोहित पवार यांनी सूचक संकेत देणारं ट्विट केलंय.

एका माध्यमसमूहाच्या कालच्या सर्व्हेने महाराष्ट्राच्या जनतेचा मूड दाखवून दिला आहे. एकदा नाहीतर दोन वेळा एवढ्या कुरापती करूनही अपेक्षित असा परिणाम मिळत नसल्याने हा सर्व्हे बघून काहींची झोप मात्र नक्कीच उडाली असणार, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

जनतेचा आणि जनतेसाठी लढणाऱ्या विचारांचा मूड आणि भूमिका मात्र “क्रिस्टल क्लिअर” आहे. सत्ता आणि पैसा कधीही जनतेसमोर आणि विचारधारेसमोर टिकाव धरू शकत नाही, हेच या सर्व्हेतून अधोरेखित झालं. येणाऱ्या निवडणुकांमध्येही त्याचं प्रतिबिंब दिसल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांना भाजप आणि राष्ट्रवादीतील बंडखोरांना दिला आहे.

दहावीत असताना वडिलांचं निधन, मजुरी करून आईने शिकवलं, पोरगं PSI झालं
अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थान असेल्या देवगिरीवर नवनिर्वाचित मंत्री आणि नेत्यांची बैठक सुरु होती. त्यातच शरद पवार वाय बी चव्हाण सेंटरला एका बैठकीच्या निमित्ताने आल्याची माहिती अजित पवार यांच्या गटातील नेत्यांना कळाली. त्यांनी तडक वाय बी चव्हाण सेंटर गाठलं. शरद पवार यांची भेट घेऊन भाजपसोबत येण्याचा पुन:प्रस्ताव दादा गटाच्या नेत्यांनी पवार यांना दिला. पवारांनी संपूर्ण प्रस्ताव ऐकून घेतला. पण त्या प्रस्तावावर एक शब्दाचंही उत्तर त्यांनी संबंधित नेत्यांना दिलं नाही. पवार काहीच प्रतिक्रिया देत नसल्याचं पाहून दादा गटाच्या नेत्यांनी बैठक आटोपती घेतली.

साहेब आमचा सरकारला पाठिंबा, आपणही आमच्यासोबत चला, दादांच्या मंत्र्यांना पवारांचं इशाऱ्यांनी उत्तर
बैठकीचा तपशील सांगताना प्रफुल पटेल यांनी सांगितलं की, आम्ही सगळ्या नेत्यांनी शरद पवार यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. पक्ष एकसंध राहावा, यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची विनंती केली. पण आमच्या प्रस्तावावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं. तसेच उद्यापासून राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरु होतंय. अजितदादांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमहोदय त्यांचं त्यांचं काम जोमाने सुरु करील, असंही प्रफुल पटेल म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed