विरार : दुकानात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना विरार परिसरात घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीररित्या जखमी झाली आहे. प्रचिती पाटील असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्यावर विरार येथील संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याची ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
भास्कर कॉम्प्लेक्स ही विरार पश्चिमेला विराटनगर परिसरात रेल्वे स्थानकानजीक असलेली इमारत आहे. या इमारतीत दुकान क्रमांक ९ हे सुनिल गुप्ता यांच्या मालकीचे दुकान असून या दुकानात प्रचिती पाटील ही तरुणी काम करते. प्रचिती दुकानात काम करत असताना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एक अनोळखी तरुणी दुकानात आली. ही तरुणी प्रचिती बसलेल्या टेबलजवळ गेली व काही कळण्याच्या आत तिने आपल्यासोबत पिशवीत आणलेल्या कोयत्याने वार करत प्रचितीवर हल्ला केला.

दुकानातच असलेल्या स्थानिकांनी वेळीच हल्लेखोर तरुणीला पकडले व पोलिसांना घटनेची माहिती देत तिला विरार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची संपूर्ण घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अज्ञात तरुणीने केलेल्या हल्ल्यात प्रचिती गंभीररित्या जखमी झाली असून तिला उपचारासाठी विरार येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, दुकानात दोन ग्राहकांमध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्या वादाच्या रागातून या तरुणीने हल्ला केला असल्याची शक्यता दुकान मालक सुनिल गुप्ता यांनी व्यक्त केली असून हल्लेखोर तरुणी याच परिसरात राहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी हल्लेखोर तरुणीविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.