• Sun. Sep 22nd, 2024

मोठी बातमी, अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मोठी बातमी, अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असताना राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक गट अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेत सरकारमध्ये सहभागी झाला होता. अजित पवार हे राज्य सरकारमध्ये अर्थमंत्री झालेले आहेत. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील आणि धर्मरावबाबा आत्राम यांनी वेगळी भूमिका घेत सरकारमध्ये मंत्रिपद स्वीकारलं होतं. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. आज अजित पवार गटाचे मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दाखल झाले आहेत. या सर्व प्रकारावर जयंत पाटील यांची भूमिका समोर आली आहे.
Jalna Murder : वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याची काकाकडून निर्घृण हत्या; घटनेनं जिल्ह्यात खळबळ

जयंत पाटील काय म्हणाले

जयंत पाटील हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते. तिथे त्यांना खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता. पवारसाहेबांनी वाय. बी. चव्हाण सेंटरला बोलावलं आहेत. त्यामुळं निघालो असल्याचं जयंत पाटील म्हणाले. मला काहीच माहिती नसून फोन आल्यानंतर तातडीनं निघालो आहे, असं जयंत पाटील म्हणाले. मला माहिती नाही मला आता फोन आल्यानंतर मी निघालो आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

जितेंद्र आव्हाड देखील वाय बी सेंटरला दाखल

अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी मुंबईत झालेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली होती. जयंत पाटील यांच्या पाठोपाठ जितेंद्र आव्हाड देखील तातडीनं वाय.बी. सेंटरला दाखल झाले आहेत.
हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; घरं अन् रस्तेही वाहिले, पुरामुळे तब्बल ८ हजार कोटींचे नुकसान

शरद पवारांच्या भेटीला कोण कोण?

अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, यांच्यासह इतर मंत्री आणि सुनील तटकरे, प्रफुल पटेल देखील वायबी सेंटला दाखल झाले आहेत. आजच्या बैठकीत काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दिलासा! टोमॅटोचे दर आवाक्यात आणण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; सरकारकडून दर निश्चित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed