• Sat. Sep 21st, 2024

गुड न्यूज, मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर नवी सुविधा,सरकत्या जिन्यासह पादचारी पूल सेवेत

गुड न्यूज, मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर नवी सुविधा,सरकत्या जिन्यासह पादचारी पूल सेवेत

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव येथे उभारण्यात आलेल्या पादचारी पुलाचे लोकार्पण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. सायन कोळीवाडा, धारावी, किंग्ज सर्कल या भागातील नागरिकांना सुरक्षितपणे पूर्व-पश्चिम रस्ता ओलांडण्यासाठी या पुलाचा उपयोग होईल. ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त असे सरकते जिने (एस्केलेटर) असणारा मुंबईतील हा पहिला पादचारी पूल आहे.

राज्य सरकारने आरोग्य, महिला सक्षमीकरण, मुंबई सुशोभीकरण, मंडया आणि कोळीवाड्यांचा विकास यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबईतील नागरिकांना तसेच ज्येष्ठांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्यामुळे मुंबईत स्वच्छता, सुशोभीकरण, आपला दवाखाना यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहिती केसरकर यांनी दिली.
सामनावीर पुरस्कार हॉटेलमध्ये घेऊन गेल्यावर यशस्वीने प्रथम काय केलं, पाहा भन्नाट व्हिडिओ…
शीव पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल बांधण्याची माटुंगा एफ उत्तर विभागातील नागरिकांची सातत्याने मागणी होती. पुलाच्या दोन्ही बाजूला दोन सरकते जिने व सामान्य जिने आहेत. एकूण ४४ मीटर लांबीचा तर ४.१५ मीटर रुंदीचा हा पूल आहे. दरदिवशी किमान सात हजार ते आठ हजार नागरिक या पुलाचा वापर करतील, असा अंदाज आहे. पूल बांधणीसाठी ५.६३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. करोना काळातील लाॅकडाऊन, सरकते जिने पुरवठादाराकडून झालेला विलंब, वृक्ष प्राधिकरण आणि वाहतूक विभागाची परवानगी अशा अनेक आव्हानांना सामोरे जात या पुलाचे काम ५२ महिने कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे.
क्रिप्टो करन्सी फसवणुकीमुळं एकाला पश्चिम बंगालमध्ये बेड्या, अभिनेत्यासह अभिनेत्रींचा पाय खोलात कारण..

ज्येष्ठांसाठी दहा बेस्ट बसेस

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासाच्या सुविधेकरिता बेस्ट उपक्रमाकडून दहा बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. न्यूयॉर्क येथील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याच्या ठिकाणी बसने नेऊन त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवला जातो. याच धर्तीवर मुंबईतील ज्येष्ठांनाही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून बेस्ट बसेस देण्यात येणार आहेत.

Chandrayaan-3 Update: तुम्हाला माहिती आहे का? या क्षणाला चांद्रयान-३ कुठे आहे; ISROने दिली आणखी एक गुड न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed