• Tue. Mar 10th, 2026

    धक्कादायक! अल्पवयीन मुलीला फूस लावून लॉजवर नेत करायचा अत्याचार, १० महिने सुरू होता प्रकार

    धक्कादायक! अल्पवयीन मुलीला फूस लावून लॉजवर नेत करायचा अत्याचार, १० महिने सुरू होता प्रकार

    पुणे : एका पोलीस अकादमीमध्ये एकत्र शिकत असताना एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावत तिला पुण्यातल्या बाळजीनगर येथील सायबा लॉजला घेऊन जात, मुलीला पॉर्न विडिओ दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. इतकेच नाही तर मुलीला अनवॉन्टेड ७२ गोळीही ( गर्भनिरोधक गोळी) खायला दिली. व विडिओ कॉल करून संबंध असेच सुरू ठेव अशी धकमी दिली. हा सगळा प्रकार सप्टेंबर २०२२ ते आता पर्यंत सुरू होता. या प्रकरणाला कंटाळून मुलीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    सहकारनगर पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपीला ताब्यात घेतले. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तानाजी ब्रम्हा कांबळे ( वय ३५ रा. मूळ गाव कुतुर. ता आजरा जिल्हा कोल्हापूर) असा त्या आरोपीच नाव आहे. त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मुकेश अंबानींना जगातील सर्वात श्रीमंत महिलेने मागे सारले, जाणून घ्या किती संपत्ती शिल्लक आहे
    या घटनेबाबत मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तानाजी ब्रम्हा कांबळे आणि फिर्यादी मुलगी हे एका पोलीस अकादमीत ट्रेनिंगला एकत्र होते. तिथे त्यांची ओळख झाली. तिथे त्याने फिर्यादीसोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर फिर्यादी मुलीच्या इच्छेविरोधात तीन ते चार वेळा सायबा लॉज येथे घेऊन जाऊन पॉर्न विडिओ दाखवत शारीरिक संबंध केले. त्यानंतर प्रत्येक वेळी शाररिक संबंध केल्यानंतर पीडित मुलीला अनवॉन्टेड ७२ ही गर्भनिरोधक गोळी खायला दिली.

    अदानी बदलणार आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचे चित्र, जाणून घ्या कसा असेल धारावीचा मेकओव्हर
    तसेच त्याबाबत कोणाला काही सांगायचं नाही म्हणून धमकी देवून आरोपीने संबंध असेच सुरू ठेवण्यासाठी सांगितले. या प्रकराच्या विरोधात पीडित मुलीने तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार आरोपी कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतच अधिक तपास सहकारनगर चे पोलीस उपनिरीक्षक राजगुरू करत आहे.
    सिनेमा हॉलमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त, कॅन्सरची औषधे करमुक्त; ऑनलाइन गेमिंग, कॅसिनोवर २८% GST

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed