• Mon. Nov 25th, 2024

    नाशिक दौरा करूनही शरद पवारांना धक्का, शेवटचा मोहराही निसटला, अजितदादांसोबत सर्व ६ आमदार

    नाशिक दौरा करूनही शरद पवारांना धक्का, शेवटचा मोहराही निसटला, अजितदादांसोबत सर्व ६ आमदार

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडावेळी तटस्थ भूमिका घेणाऱ्या देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आता अजितदादांना पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अनेक आमदारांनी अजितदादांसोबत जाण्याची आपली भूमिका जाहीर केली होती. मात्र सरोज अहिरे या तटस्थ होत्या. अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळ अहिरे या अजितदादांसोबत दिसून आल्या आणि त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला.

    नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आगमन, समर्थकांचा उत्साह शिगेला


    नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही नाशिकमध्ये आले होते. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे वंदे भारत एक्सप्रेसने नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी नाशिक रोड इथं त्यांचं पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केलं. यावेळी नाशिक रोड परिसरातीलच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना सरोज अहिरे या थेट अजित पवार यांच्या सोबत दिसल्या.
    सुप्रियांशी फोन, अंतर्मनाने सांगितलं काकीला भेटायला सिल्व्हर ओकवर जायलाच हवं : अजित पवार
    मतदारसंघातील विकास रखडला असून अनेक विकास कामं थांबून आहेत. आणि ही विकास कामं सुरू होण्यासाठी तसेच विकास कामांना गती मिळण्यासाठी सत्तेत राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अजित पवार यांना पाठिंबा देत असल्याचे सरोज अहिरे यांनी स्पष्ट केलं. सरोज अहिरे यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याने आता नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्वच आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे.
    सरोज अहिरे राष्ट्रवादीत कुणाला साथ देणार निर्णय वेटिंगवर, देवळालीत राजकीय संघर्ष सुरु पण कुणासोबत, जाणून घ्या
    नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकूण सहा आमदार आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ यांनी थेट अजित पवार यांच्या सोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. तर उर्वरित आमदारांनी विकास कामाच्या मुद्द्यावरून त्यांना पाठिंबा दिला. उर्वरित आमदारांमध्ये सरोज अहिरे ह्या नाशिक जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादीच्या आमदार तटस्थ होत्या. मात्र आज त्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.

    येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांनी थेट अजित पवार यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली. तर विधानसभा उपाध्यक्ष आणि पेठ – दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ, निफाड मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर, कळवणचे आमदार नितीन पवार, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एकमेव महिला आमदार सरोज अहिरेही अजित पवारांसोबत गेल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

    आमदार सरोज अहिरे ह्या मागच्या काही दिवसांपूर्वी रुग्णालयात होत्या. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबत नाशिक दौऱ्यावर आलेल्या सुप्रिया सुळे यांनी आमदार अहिरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जात सरोज अहिरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी आमदार सरोज अहिरे यांची भूमिका तटस्थ होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *