२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याचं दिसून आलं होतं. मात्र, काही दिवस संघर्षाचे गेल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात संवाद सुरु झाल्याचं दिसून आलं. पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांचा अपघात झाला तेव्हा त्यांना भेटायला गेल्याचं देखील दिसून आलं होतं.
गेल्या काही दिवसांपूर्वी परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी सामंजस्याची भूमिका घेत कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली होती. त्यामुळं देखील परळी मतदारसंघातील दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं.
धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मुंबईत पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. पंकजा मुंडे यांनी देखील धनंजय मुंडे यांचं मंत्री झाल्याबद्दल औक्षण केलं होतं. याचे फोटो व्हिडिओ देखील समाजमाध्यमांमध्ये आले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांमधील संघर्ष कमी होत असल्याचं चित्र दिसून आलं होतं.
परळीत धनंजय मुंडे यांच्या बॅनरवर पंकजा मुंडे यांचा फोटो
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे एकत्रित फोटो बॅनरवर आल्यानं पुढील काळात त्यांच्या मध्ये आमने सामने लढत होईल. राजकीय वाद संपवला जाईल हे पाहावं लागेल. आता भाजप आणि राष्ट्रवादीतील अजित पवार यांचा गट सत्तेत एकत्रित आल्यानं दोन्ही नेते महायुतीतील सहकारी बनले आहेत.