या निवडणुका कोणालाही बरोबर घेऊन लढवायच्या नाहीत आणि मला खात्री आहे की खेडमधल्या निवडणुका आपण ज्यावेळेला स्वबळावर लढू त्यावेळेला पुन्हा एकदा नक्कीच यश मिळेल, असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावरती मनसे नेते अविनाश अभ्यंकर, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, सचिन गायकवाड आदी मनसे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यात ‘एक सही संतापाची’ हा कार्यक्रम आपण राज्यभर राबवला. त्याला जनतेतून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. लोकांनी येऊन येऊन त्याच्यावरती सह्या केल्या. मला आता एकच पहायचे आहे की, येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता त्यांचा राग व्यक्त करतेय का, की पुन्हा यांच्या सगळ्या पैशाच्या तमाशा वरती विकले जाणाप आहेत का, असा बोचरा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खेड येथील सभेत बोलताना व्यक्त केला. आणि त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडणार असतील तर या निवडणुकीला काहीच अर्थ नाही असे स्पष्ट करत त्यांनी आपला सरकारवरचा व सद्यस्थितीतील राजकारणावरचा राग व्यक्त केला आहे. यावेळी खेड येथे ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, महिला व व अनेक युवकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
समृद्धी महामार्ग चार वर्षात मग कोकणातला रस्ता का होत नाही?
तुम्ही अनेकदा दरवर्षी मतदानाला जाता त्याच त्याच आमदारांना खासदारांना निवडूनही देता, मात्र एकच विचार करा समृद्धी महामार्ग जर साडेचार वर्षांमध्ये पूर्ण होऊ शकतो तर कोकणातला मुंबई गोवा महामार्ग सतरा वर्षात पूर्ण का होऊ शकत नाही, असा खडा सवालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मी मागच्या कोकण दौऱ्यावेळी आलो होतो तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन केला होता. तेव्हा ते म्हणाले की कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. आपण या गोष्टीवरती हसतो. मात्र पुन्हा आपण या सगळ्यांनाच मतदान करण्यासाठी उभे राहतो त्यावेळेला मला मात्र या सगळ्याच आश्चर्य वाटतं, अशीही बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली.